Pearl Farming: मोतीच्या शेतीने उघडले यशाचे दार; मोती शेतीतुन ‘हा’ पट्ठ्या कमवतोय वार्षिक 30 लाख; वाचा ही यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer succes story : शेती (Farming) हा बारामाही चालणारा व्यवसाय मात्र या व्यवसायात काळाच्या ओघात बदल करणे अतिशय महत्वाचे आहे. शेतीमध्ये बदल केला अन त्याला योग्य नियोजनाची सांगड घातली तर निश्चितचं यशाला गवसणी घालता येणं शक्य असतं.

शेती मध्ये बदल करून लाखों रुपये उत्पन्न कमवण्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर वारंवार येतं असतात. आज देखील आज आपण बिहार मधील एका अवलिया शेतकऱ्याचा शेतीमधला एक नावीन्यपूर्ण बदल जाणुन घेणार आहोत.

मित्रांनो बिहार (Bihar Farmer) मधील एका अवलिया शेतकऱ्याने शेतीत जरा हटके करण्याच्या विचारातून मोतीची शेती (Pearl Farming) सुरु केली अन यामुळे या शेतकऱ्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला. आजच्या घडीला हा शेतकरी मोतीच्या शेतीतुन लाखों रुपयांची कमाई करत आहे.

कोण आहे हा अवलिया शेतकरी?
बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील रहिवासी असलेला नितिल हा दिल्लीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता. चांगला पगारही होता, पण नंतर त्यांच्या आयुष्यात असे टर्निंग पॉईंट आले की ते नोकरी सोडून गावी परतले.

आज तो मोती शेती करत आहे. नितील त्यांनी उत्पादीत केलेले मोती दिल्ली, मुंबई, कोलकाता यासह देशातील अनेक भागात पुरवत आहेत. यामुळे त्यांना वर्षाला 30 लाख रुपयांची कमाई देखील होत आहे.

कशी झाली या व्यवसायाची सुरवात
मित्रांनो नितील 2017 मध्ये आपल्या गावाकडे आले होते. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी वर्तमानपत्रात मोत्यांच्या लागवडीबद्दल वाचले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी नितीलसोबत याविषयी माहिती शेअर केली. नितील यांना देखील ही मोत्याची शेतीची संकल्पना आवडली.

नितील यांना वाटले की हा एक वेगळा पर्याय असू शकतो. नितील म्हणतात, त्यादरम्यान त्यांना माहिती मिळाली की मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे मोती शेतीसाठी प्रशिक्षण दिले जाते. मग काय रजा घेऊन नितील मध्य प्रदेशात गेले. तिथं त्यांना त्याची प्रक्रिया समजली. काही दिवस तिथे राहून नोकरीही केली. त्यानंतर ते गावी परतले.

25,000 रुपयांपासून सुरू केली मोतीची शेती
2019 मध्ये, नितिलने नोकरी सोडली आणि मोत्यांची शेती करण्यास सुरुवात केली. प्रथम त्यांनी एक एकर जमिनीवर तलाव खोदला. यासाठी त्यांना शासनाकडून 50 टक्के अनुदान देखील मिळाले.

त्यानंतर चेन्नईहून 500 शिंपले आणून आपल्या तलावात लावली. सुरुवातीला यासाठी त्यांना सुमारे 25 हजार रुपये खर्च करण्यात आले, मात्र पहिल्यांदाच त्याला 75 हजार रुपयांचा नफा झाला. यानंतर निथिलने याची व्याप्ती वाढवली.

आता 30 लाखांची कमाई
पुढील वर्षी त्यांनी तलावात 25 हजार शंख टाकले. यातून 15 हजारांहून अधिक शिंपले वाचवण्यात आले. यानंतर त्यांनी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मोती बनवले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे मार्केटिंग सुरू केले.

ते म्हणतात की, त्यांच्या उत्पादनाची चांगली विक्री झाली. अनेक व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडून उत्पादने खरेदी केली. एकूण 25 ते 30 लाख रुपये कमावले.