Health Insurance Plan 2022: आता देशभरात लोकांना मिळणार स्वस्तात उपचार, सरकारने घेतला हा मोठा निर्णय….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Insurance Plan 2022: कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Employees State Insurance Corporation) ने निर्णय घेतला आहे की, त्यांची आरोग्य विमा योजना 2022 (Health Insurance Plan 2022) च्या अखेरीस देशभरात लागू केली जाईल.

सध्या कर्मचारी राज्य विमा (ESIC) योजना 443 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे आणि 153 जिल्ह्यांमध्ये अंशत: लागू आहे. एकूण 148 जिल्हे अजूनही या विमा योजनेच्या कक्षेबाहेर आहेत.

कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांच्या अध्यक्षतेखाली ESIC च्या 188 व्या बैठकीत देशभरात वैद्यकीय सेवा (Medical services( आणि सेवा वितरण प्रणालीच्या विस्तारासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

अनेक ठिकाणी नवीन दवाखाने सुरू होणार –

अंशतः कव्हर केलेले आणि न कव्हर केलेले जिल्हे वर्षाच्या अखेरीस ESIC योजनेंतर्गत पूर्णपणे समाविष्ट केले जातील, असे निवेदनात म्हटले आहे. नवीन दवाखाना (Dispensary) सह शाखा कार्यालय स्थापन करून आरोग्य सुविधा सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. याशिवाय ESIC ने देशभरात 100 खाटांची 23 नवीन रुग्णालये उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

या राज्यांमध्ये रुग्णालये सुरू होतील –

यातील सहा रुग्णालये महाराष्ट्रात पालघर, सातारा, पेण, जळगाव, चाकण आणि पनवेल येथे सुरू करण्यात येणार आहेत. हरियाणात हिसार, सोनीपत, अंबाला आणि रोहतकमध्ये चार रुग्णालये उघडली जातील. तामिळनाडू (चेंगलपट्टू आणि इरोड) येथे दोन, उत्तर प्रदेशात (मोरादाबाद आणि गोरखपूर) दोन आणि कर्नाटकात (तुमकूर आणि उडुपी) दोन रुग्णालये उभारली जातील.

ESIC आंध्र प्रदेशातील नेल्लोर, छत्तीसगडमधील बिलासपूर, गोव्यातील मुलगाव, गुजरातमधील साणंद, मध्य प्रदेशातील जबलपूर, ओडिशातील झारसुगुडा आणि पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे प्रत्येकी एक रुग्णालय उभारणार आहे).

पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे केल्या जात आहेत –

या रुग्णालयांशिवाय विविध ठिकाणी दवाखानेही सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात 48, दिल्लीत 12 आणि हरियाणामध्ये 2 दवाखाने उघडण्यात येणार आहेत. विमाधारक कर्मचारी (Insured employees) आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना दवाखान्यांद्वारे उत्तम दर्जाची आरोग्य सेवा पुरविली जाईल.

सर्वोत्तम वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी, ESIC नवीन रुग्णालये उभारण्यासाठी आणि विद्यमान रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर काम करत आहे.

व्यावसायिकांची नियुक्ती केली जाईल –

बैठकीत घेतलेल्या इतर महत्त्वाच्या निर्णयांमध्ये विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वैद्यकीय सेवा सुधारण्याचा समावेश आहे. ESIC ने राज्य सरकार संचालित ESIC हॉस्पिटल, सोनगिरी, भोपाळ थेट त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या ईएसआयसी रुग्णालयांमध्ये स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्टच्या अनुपलब्धतेची तफावत भरून काढण्यासाठी आता आवश्यक व्यावसायिकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.