Hero Bike Offer : स्वस्तात मिळत आहे हिरोची 75 किमी मायलेज देणारी बाईक, जाणून घ्या फीचर्स आणि ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hero Bike Offer : जर तुम्ही कमी किमतीत बाईक खरेदी इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. तुम्हाला स्वस्तात हिरोची 75 किमी मायलेज देणारी बाईक खरेदी करता येईल. यात कंपनीने शानदार फीचर्स उपलब्ध करून दिले आहे.

Hero HF Deluxe ची एकूण चार प्रकारांत विक्री केली जात आहे. किमतीचा विचार केला तर त्याची किंमत 62,862 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि ती 70,012 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते. या बाईकमध्ये 9.5 लीटरची इंधन टाकी दिली आहे. तसेच यात अॅक्सेसरीज म्हणून USB मोबाइल चार्जर मिळेल. या बाइकमध्ये 60-65 किलोमीटर प्रति लिटर मायलेज मिळेल.

बजाज प्लॅटिना 100: बजाज च्या या बाइकची अनेक काळापासून बाजारात विक्री केली जात आहे. कंपनीच्या Platina 100 मध्ये 102cc इंधन कार्यक्षम DTS-i इंजिन देण्यात आले आहे जे 7.9 bhp पॉवर आणि 8.3 Nm टॉर्क तयार करते. हे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. त्याची इंधन टाकीची क्षमता 11 लीटर इतकी आहे.

बजाज प्लॅटिना 100 ची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 67,808 रुपयांपासून सुरू होते आणि 110 सीसी ड्रम ब्रेक प्रकाराची किंमत 70,400 रुपये इतकी आहे. बजाज प्लॅटिना ही देशातील एकमेव 110 सीसी बाईक असून यात कंपनीने ABS सारखे महत्त्वाचे सेफ्टी फीचर दिले आहे. या बाईकमध्ये 65-70 किमीची रेंज मिळेल असा कंपनीने दावा केला आहे.

TVS Star Sport: TVS ची Star Sport ही भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम मायलेज देणारी बाईक आहे. यात 110cc फ्युएल इंजेक्टेड इंजिन आहे जे 6.03 bhp पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. ही बाईक अपडेटेड BS-6 फेज-2 नियमांचे पालन करत असून E20 इंधनावरही चालते. यात 4-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाईकचा टॉप स्पीड ताशी 90 किलोमीटर आहे.

ही स्टार स्पोर्ट बाईक एका लिटर पेट्रोलमध्ये 75 किलोमीटरचे मायलेज देईल, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने या बाईकमध्ये Ecothrust Fuel Injection (ET-Fi) तंत्रज्ञानाचा वापर केल्याने ही बाईक उत्तम मायलेज देते. TVS Star Sport ES आणि ELS या दोन प्रकारांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. किमतीचा विचार केला तर त्यांच्या एक्स-शोरूम, दिल्लीच्या किमती अनुक्रमे 59,431 रुपये आणि 70,773 रुपये इतक्या आहेत.