Golden Guys : इतके श्रीमंत कसे झाले ? सोन्याच्या कार आणि मोबाईल आले कुठुन?

Golden Guys : पुण्याचे गोल्डन बॉइज म्ह्णून ओळख असणारे सनी नानासाहेब वाघचौरे व संजय गुजर हे तर तुम्हाला माहितीच असतील. सोन्याच्या कार मोबाईल आणि गळ्यातील सोन्याच्या साखळ्या यामुळे ते कमी वेळात जास्त प्रकाशझोतात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बिग बॉस हिंदी मध्ये सनी वाघचौरे आणि संजय गुजर यांनी वाइल्ड कार्डमधूनच प्रवेश केला आहे. गोल्डन बॉइज म्हणून त्यांची पुणे आणि अख्या महाराष्ट्रात ओळख आहे. ते दोघेही मूळचे पुण्याचे आहेत.

Advertisement

सनी वाघचौरे आणि संजय गुजर हे दोघेही बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वात आले होते. त्यांना सोन्याच्या गाड्या आणि मोबाईल बद्दल प्रश्न विचारण्यात आले मात्र त्यांनी या प्रश्नाची उत्तरे दिले नाहीत.

सनी वाघचौरे आणि संजय गुजर हे दोघेही गळ्यामध्ये अडीच ते तीन किलो सोने गळ्यामध्ये घालून फिरत असतात. हे दोघेही अनेक कार्यक्रमात जात असतात. तसेच मोठमोठ्या कार्यक्रमात त्यांना निमंत्रण दिले जाते.

Advertisement

सनी वाघचौरे आणि संजय गुजर यांच्याकडे अनेक गाड्या आहेत. मात्र यामधील गाड्यांना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. तसेच या दोघांकडे अनेक महागाड्या गाड्या देखील आहेत.

संजय गुजर आणि सनी वाघचौरे यांच्याकडे जॅग्वार एक्सई ही ५० लाख किमतीची गाडी त्यांच्याकडे आहे. मोठमोठ्या सेलिब्रिटींकडे असणारी ‘ऑडी क्यू ७’ ही गाडीही गोल्डन बॉइजकडे आहे.

Advertisement

एवढेच नाही तर त्यांच्याकडे २.८ कोटी किंमत असलेली रेंज रोव्हरही देखील आहे. ते अनेकदा महागाड्या गाडीतून फिरताना दिसत असतात. हे दोघेही सोशल मीडियावरही सारखे ऍक्टिव्ह असतात.

‘गोल्डन गाईज’कडे किती सोने आहे?

रिपोर्टनुसार, सनी सुमारे सात-आठ किलो सोने परिधान करतो आणि बंटीने अंगावर चार-पाच किलो सोने घातले आहे. सोन्याच्या अॅक्सेसरीजमध्ये दोघांच्या गळ्यात अनेक सोन्याच्या चेन दिसतात. हातात सोन्याचे ब्रेसलेट, ब्रेसलेट, सोन्याचे घड्याळ आणि अंगठी परिधान करताना. सनीने 4.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने घातले आहे आणि बंटीने 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने घातले आहेत.

Advertisement

सनी वाघचौरे याच्यावर पत्नीनेच केला आहे गुन्हा दाखल

सनी वाघचौरे याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीसाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सनीशिवाय त्याच्या आई-वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनीच्या पत्नीने तिचा पती आणि इतर सासरच्या मंडळींवर अनेक वर्षांपासून छळ केल्याचा आरोप केला आहे. गर्भपात करण्यास भाग पाडणे आणि बेल्टने मारहाण केल्याचा गंभीर आरोपही पीडितेने पती आणि सासूवर केला आहे.

Advertisement