Petrol-Diesel Price Today: किती दिवस स्थिर राहतील पेट्रोल-डिझेलचे दर? दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या प्रमुख शहरांचे दर जाणून घ्या एका क्लिकवर…….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol-Diesel Price Today: भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol and Diesel Rates) कोणताही बदल केलेला नाही, त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) च्या ताज्या अपडेटनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज (बुधवार) 3 ऑगस्ट रोजी एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आहे, तर एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपयांवर स्थिर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (crude oil prices) चढ-उतार होत असताना राष्ट्रीय स्तरावर 21 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने स्थिर आहेत. अशा स्थितीत पेट्रोल-डिझेलचे दर किती दिवस वाढणार नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर कच्च्या तेलाचे दर असेच घसरत राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या स्थिर राहू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com नुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (The financial capital Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात –

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या (Oil Marketing Companies) दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.