Bike Care Tips : तुम्हीही ‘अशी’ बाईक चालवत असाल तर वेळीच सावध व्हा, होऊ शकते खूप मोठे नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bike Care Tips : जर तुम्हाला बाईक चालवण्याची आवड असेल तर मग तुम्ही जपूनच बाईक चालवायला हवी, असे तुम्हाला अनेकदा सांगितलेच असेल. परंतु, लोकांचे सांगणे आपण कुठे ऐकतो? त्यांच्या सांगण्याकडे आपण लक्ष न देता आपल्या मनाला जसे वाटेल तसेच करतो.

देशभरात उन्हाळा सुरु होईल. अशातच या दिवसात बाईकची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तसेच अनेकजण नकळत बाईक चालवत असताना काही चुका करतात. त्यामुळे त्यांना खूप मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

होते कायमचे नुकसान

बऱ्याचदा लोक बाईक चालवत असताना क्लचचा वापर न करता बाईक चालवतात. जर तुम्ही बाइक जास्त वेळ अशीच चालवली तर क्लच तुटण्याचा धोका जास्त वाढतो किंवा मोठा बिघाड होऊ शकतो.

होते सरासरी कमी

बाईकमधील गीअर बदलण्यासाठी जेव्हा जेव्हा क्लचचा वापर करण्यात येत नाही तेव्हा इंजिनचा वेग कमी होत नाही. जर तुम्ही असे करत असाल तर इंजिनवर दबाव येतो आणि सरासरी कमी होते.

सतत गियर अडकणे

क्लच न वापरता बाईक चालवली तर अनेकदा प्रवासाच्या मध्यभागी अशी परिस्थिती उद्भवते जेव्हा बाईकचा गियर वर किंवा खाली नसतो. बाईक ज्या गीअरमध्ये असते, त्याच गिअरमध्ये बाईक राहते, त्यामुळे गाडी चालवताना समस्या निर्माण होते आणि अनेकदा बाईक हलवताही येत नाही.

चेन तुटण्याचा धोका निर्माण होतो

क्लच न दाबता गिअर बदलला तर त्याचा बाईकच्या चेनवरही वाईट परिणाम होतो. जर तुम्ही असे सतत करत असाल तर दुचाकीची साखळीही कमकुवत होते आणि चालताना तुटण्याचा धोकाही जास्त वाढतो. हे लक्षात ठेवा की दुचाकी चालवत असताना साखळी तुटली तर अपघाताचा धोका वाढत जातो.

अशी चालवा बाईक

बाईक चालवत असताना सतत गीअर्स बदलण्यासाठी क्लचचा वापर करा. बाईकची रेस सोडून गिअर बदलण्यापूर्वी क्लच दाबून गीअर बदलावा. असे केल्याने गीअर्समध्ये कधीही अडचण येत नाही.