Traction Control : ओल्या रस्त्यावरील अपघात टाळायचा असेल तर ‘हे’ फीचर येईल कमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Traction Control : राज्यात सध्या धुक्याची चादर पसरत आहे. अशातच अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत, कारमध्ये असलेल्या फीचरचा वापर करून अपघात टाळू शकता.हे फीचर काय आहे? अपघातांपासून कसे संरक्षण करते आणि ते कसे वापरले जाते? ते जाणून घेऊया.

खरं तर थंडीच्या दिवसामध्ये हवामान दमट राहते आणि या आर्द्रतेमुळे रस्ते ओले होऊ लागतात. रस्ते ओले असल्यामुळे टायरची पकड कमी होऊन ब्रेक लागत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत जातो. परंतु, कारमध्ये असलेल्या या फीचरमुळे अपघात कमी होतात.

काय आहे फीचर

या फीचरच्या मदतीने, ओल्या रस्त्यावर कार सहज चालवता येते. हे फीचर केवळ टायर आणि ओल्या रस्त्यावरील घसरणी कमी करत नाही तर तुम्हाला कारवर नियंत्रण मिळते.

असे होतात अपघात

थंडीच्या दिवसात हवामान दमट असते. या आर्द्रतेमुळे रस्ते ओले होतात. त्यामुळे ओल्या रस्त्यावर गाडी चालवताना टायरची पकड कमी होते आणि अचानक ब्रेक लागत नसल्याने अपघाताचा धोका जास्त असतो.

काय आहे या फीचरचा फायदा

हे फीचर चालू असताना, कारमध्ये व्हील सेन्सर वापरला जातो, ज्याच्या मदतीने टायरमध्ये घर्षण सुरु होते. त्यामुळे कारचा टायर स्लिपरीच्या वेळी सामान्यपेक्षा जास्त वेगाने फिरतो, तेव्हा टायरजवळील सेन्सरकडून माहिती मिळते. ज्यामुळे कारमधील ECM इंजिनची शक्ती कमी करते.

दिला जातो इशारा

ट्रॅक्शन कंट्रोलमुळे अपघाताचा धोका ओळखून आगाऊ चेतावणी दिली जाते. जेव्हा कारचे टायर सामान्यपेक्षा वेगाने फिरू लागतात, तेव्हा ते डॅशबोर्डवरील MID मधील चेतावणी दिवा चालू करते. परंतु, तुमच्या कारमध्ये ते अनेकवेळा जळत राहिले आणि विझत राहिले तर, गाडीचे टायर बदलण्याची वेळ आली आहे, असा संदेशही त्यातून मिळतो.