IMD Alert : महाराष्ट्रासह अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; IMDचा अलर्ट जारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Alert : राज्यात मान्सूनच्या पावसाने (Monsoon Rain) पुन्हा वेग पकडला आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे. मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनच्या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सप्टेंबर महिन्यात राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळ्णार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसापासून वंचित राहिलेल्या भागात पुढील काही दिवस पाऊस पडू शकतो, असे एमआयडीचे म्हणणे आहे.

जम्मू-काश्मीर, लडाख, महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही पावसाची शक्यता आहे. यासोबतच दक्षिण भारतातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज बंगळुरूमध्ये पावसाचा अहवाल जारी केला आहे. हवामान तज्ज्ञ डॉ.गीता अग्निहोत्री यांच्या मते, बंगळुरूमध्ये पुढील २-३ दिवस पाऊस सुरू राहू शकतो.

छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, कर्नाटकसह अनेक राज्यांच्या काही भागात आज पावसाची शक्यता आहे. यासोबतच ईशान्य भारतातील राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.

आज पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडसह बिहारच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. झारखंडमध्ये १० सप्टेंबरपर्यंत ढगाळ आकाश राहील. पावसासोबतच आज बिहारच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे.

यासोबतच आज उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये पाऊस पडू शकतो, तर नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील विविध भागात पावसाची शक्यता आहे. याशिवाय आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

स्कायमेट वेदर या खासगी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या एजन्सीनुसार, अंदमान आणि निकोबार बेट, लक्षद्वीप आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, कर्नाटक, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा (Marathwada) काही भाग, अंतर्गत तामिळनाडू, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यासोबतच ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, बिहारचा काही भाग, झारखंड, दक्षिण ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, दक्षिण गुजरात आणि तेलंगणामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पश्चिम हिमालय, तामिळनाडूचा काही भाग, रायलसीमा, किनारी आंध्र प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.