न्युझीलंडविरुद्धची टी-20 मालिका भारताने जिंकली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आलेला दुसरा टी-20 सामना भारताने 7 विकेट आणि 14 चेंडू राखून जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 153 धावा केल्या होता.

सलामीवीर रोहित शर्मा (55) आणि के. एल. राहुल (65) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला आहे. या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक झळकावले.

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याने 29व्यांदा 50 पेक्षा जास्त धावा केल्या. हा एक विक्रम आहे. विराट कोहलीनेही सर्वाधिक 29 वेळा हा पराक्रम केला आहे.

रोहितने 4 शतके आणि 25 अर्धशतके केली आहेत. कोहलीला आतापर्यंत एकही शतक झळकावता आलेले नाही. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रम रोहितच्या नावावर आहे.

दरम्यान, या मालिकेतील पहिला सामना जयपूरमध्ये खेळवला गेला होता, जो टीम इंडियाने पाच विकेट्सने जिंकला होता. शुक्रवारी झालेला

सामना जिंकून भारताने 3 सामन्यांच्या मालिकेवर कब्जा केला आहे. त्यामुळे पुढच्या टी-20 सामन्यात विजय मिळवत न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.