Indian Railways Update : प्रवाशांना केवळ प्लॅटफॉर्म तिकीटाने प्रवास करता येतो? दंड टाळायचा असेल तर जाणून घ्या रेल्वेचा नवीन नियम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Railways Update : देशात कुठेही प्रवास करत असताना सुरक्षित आणि खिशाला परवडणारा पर्याय म्हणून भारतीय रेल्वेच्या प्रवासाकडे पाहण्यात येते. परंतु जर तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे रेल्वेचे तिकीट असावे लागते.

जर तुमच्याकडे रेल्वेचे तिकीट नसेल तर तुमच्याकडून दंड आकारण्यात येतो. समजा तुम्हाला अचानक रेल्वे प्रवास करावा लागला आणि तुमच्याकडे तिकीट नसेल तर घाबरू नका. कारण तिकीट आरक्षणाशिवाय प्रवास आता करण्याचा पर्याय रेल्वेकडून उपलब्ध करून दिला आहे.

समजा वैध तिकीटाशिवाय प्रवाशांना पकडले गेले तर रेल्वे दंड आणि तुरुंगवासासह कठोर कारवाई करेल. तसेच अजून एक नियम आहे जो प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांना परवानगी देत असल्याने त्यांच्याकडे वैध तिकीट नसले तरीही त्यांना प्रवास करता येतो.

तुम्ही हे तिकीट रेल्वे स्टेशनवर खरेदी करू शकता. एकदा बोर्डिंग केल्यानंतर, प्रवासी त्याच्या बोर्डिंग स्टेशनपासून त्याच्या गंतव्यस्थानापर्यंतच्या प्रवासासाठी TTE कडून तिकीट खरेदी करू शकतात. परंतु हे लक्षात ठेवा की प्रवासाच्या वर्गाच्या आधारावर भाडे निश्चित करण्यात येईल.

जाणून घ्या आणखी एक नियम

जर प्रवाशांनी रेल्वे स्थानकावरील तिकीट काउंटरवरून तिकीट खरेदी केल्यास त्यांना प्रत्यक्ष तिकीट बाळगावे लागते. तसेच तिकिटाचा फोटो किंवा डिजिटल प्रत वैध तिकीट मानली जात नसून एखाद्या प्रवाशाकडून काउंटरचे तिकीट हरवले तर त्याला काही अटी पूर्ण कराव्या लागतील.

इतकेच नाही तर त्यांना प्रवास करण्यासाठी दंड भरावा लागतो. ज्या तिकिटावर ज्या व्यक्तीचे नाव आहे ती व्यक्ती प्रवास करत असेही त्यांना सिद्ध करावे लागते. या सर्व प्रक्रियेनंतर त्यांना प्रवास करता येतो.

दरम्यान सर्व प्रवाशांनी सुरळीत आणि त्रासमुक्त प्रवास करायचा असेल तर भारतीय रेल्वेच्या नियमांची त्यांना माहिती असणे गरजेचे आहे. या नियमांचे पालन करून, प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा व्यत्यय येणार नाही याची खात्री करता येऊ शकते.