IPL 2022 ! पहिल्याच सामन्यात चॅम्पियन चेन्नईचा पराभव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Sports news :- आयपीएलच्या १५ व्या हंगामाला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलंय. चेन्नईने दिलेलं १३२ धावांचं लक्ष्य केकेआरने सहज पार करत सामना खिशात घातला.

केकेआरच्या या विजयात अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स यांनी मोलाची कामगिरी केली असून गतविजेत्या चेन्नईला यावेळी केकेआरने पहिल्याच सामन्यात धूळ चारली आहे.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेले चेन्नईचे खेळाडू मैदानावर जास्त काळ तग धरू शकले नाहीत. चेन्नईने वीस षटकांत १३१ धावांचे लक्ष्य केकेआरसमोर ठेवले.

दरम्यान हे आव्हान स्वीकारत केकेआरच्या खेळाडूंना चांगला खेळ केला. केकेआरच्या अजिंक्य रहाणेने ३४ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४४ धावा केल्या. त्यानंतर व्यंकटेश अय्यरने १६ चेंडूंमध्ये १६ धावा करत संघाला विजयाची वाट सुकर करुन दिली. सॅम बिलिंग्सने २२ चेंडूंमध्ये २५ धावा तर नितीश राणाने १७ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या.या खेळामुळे केकेआरला विजय सोपा झाला.

धोनीने लाज वाचवली
वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला.

चेन्नई इतकी कमी धावसंख्या करेल अशी अपेक्षा नव्हती. अवघ्या 61 धावात चेन्नईचा निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यावेळी महेंद्रसिंह धोनीने चेन्नईची लाज वाचवली.

धोनीने रवींद्र जाडेजासोबत संयमी फलंदाजी केली व अखेरच्या काही षटकांमध्ये आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. त्यामुळे चेन्नईला 130 धावसंख्येपर्यंत पोहोचता आले.