सिनेचे पाणी पेटले…? एकाच धरणाचे एकाच दिवशी दोन वेळा जलपूजन….!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News:आजपर्यंत पाणी मिळण्यावरून अनेकदा वाद निर्माण झाल्याचे पाहिले आहेत. मात्र आता ओव्हरफ्लो झालेल्या धरणाच्या जलपूजनावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.

कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सिना धरण नुकतेच पावसाच्या व भोसा खिंडीद्वारे सोडलेल्या कुकडी ओव्हरफ्लोच्या पाण्याने ओव्हरफ्लो झाले.

दरम्यान धरणातील पाण्याच्या जलपूजनासाठी राष्ट्रवादी व भाजपाच्या आमदारांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजता राष्ट्रवादीचे कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार व आष्टी, पाटोदा, शिरूरचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

तर दुपारी ४ वाजता भाजपाचे माजी मंत्री व विधानपरिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे व आमदार सुरेश धस यांनी जलपूजन केले.

एकाच दिवशी एकाच धरणाचे वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या आमदारांकडून जलपूजन करण्यात आल्याने दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चेचा बनला.

दरम्यान सिना धरणाच्या पाण्याचे जलपूजन या कार्यक्रमात दोन्हीही पक्षांच्या आमदारांकडून श्रेयवाद व दावे प्रतिदावे केल्याने पुन्हा एकदा सिना व कुकडी ओव्हरफ्लोच्या पाण्याचे राजकारण पेटले आहे.

सिना कुकडी पाण्याचे नेहमीच राजकारण झाले आहे. मात्र एकाच दिवशी दोन वेळा झालेल्या जलपूजनाच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा २०१० मधील पुनरावृत्ती झाली आहे.

यापूर्वी सिना धरण सन.२०१० मध्ये ओव्हरफ्लो झाले होते. त्यावेळी देखील धरणाच्या पाण्याचे सलग चार वेळा वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांकडून जलपूजन करण्यात आले होते.

तर काल दोन वेळा वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून जलपूजन झाले. यावेळी राष्ट्रवादीचे आ.आजबे यांनी कुकडी ओव्हरफ्लोच्या पाण्यामुळे मेहकरी तलाव पूर्ण क्षमतेने भरले,

असुन सिना धरणात कुकडीचे पाणी आ.पवार यांच्या प्रयत्नातूनच आल्याचे सांगितले. तरआ.राम शिंदे यांनी कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी कोणी आणले हे जनतेला माहित आहे.

असे सांगत मागील तीन वर्षांत सिना धरणात कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी आले नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात तब्बल ४५ दिवस कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी सुरू असल्याने आपण प्रयत्न करून हे पाणी सिनामध्ये सोडले. असुन कोणीही श्रेय घेऊ नये असे त्यांनी आ.रोहित पवार यांचे नाव न घेता टोला लगावला.