Jyotish Tips : सावधान! शनीमुळे 3 राशींच्या लोकांच्या अडचणीत होईल वाढ, करा ‘हा’ उपाय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jyotish Tips : सध्या संपूर्ण देशात नवरात्रीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. नऊ दिवस घटस्थापना करून दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. परंतु या काळात काही राशींच्या व्यक्तीचे नशिब बदलेल. कारण काही राशींवर शनिदेवाची नजर असेल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार (कोणत्याही ग्रहाचा उदय, अस्त, प्रतिगामी होणे हे सर्व राशीच्या जातकांच्या जीवनावर चांगले आणि वाईट प्रभाव टाकत असतात. असे म्हटले जाते की ज्या लोकांच्या पत्रिकेत शुक्राची स्थिती मजबूत असते, त्यांना जीवनात भौतिक सुख, विलास, प्रसिद्धी मिळत असते. शनिदेवाची नजर काही राशींवर असणार आहे.

मकर रास

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचा स्वामी शनिदेव असून मकर रास असणाऱ्या लोकांसाठी शनीची साडे सती सुरु आहे. अशा स्थितीत या राशींच्या लोकांनी माँ दुर्गेच्या दुसऱ्या रूपाची म्हणजेच माँ ब्रह्मचारिणीची पूजा करावी. इतकेच नाही तर दुर्गा सप्तशतीच्या चौथ्या अध्यायाचे पठण करावे. धार्मिक मान्यतांनुसार नवरात्रीच्या काळामध्ये रामायणाच्या सुंदरकांडाचे पठण केले तर त्या व्यक्तीला अपेक्षित फळ मिळते.

मीन रास

मीन रास असणाऱ्या लोकांचा स्वामी बृहस्पति आहे. त्यामुळे देवी भगवतीच्या रूपांची पूजा करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकेल. परंतु मीन रास असणाऱ्या लोकांवरही शनीच्या साडे सतीचा प्रभाव असेल. अशा स्थितीत व्यक्तीने महागौरी आणि जगदंबेची पूजा करणे गरजेचे आहे. असे केले तर त्या व्यक्तीला विशेष परिणाम मिळू शकतात. त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतील.

कुंभ रास

ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ रास असणाऱ्या लोकांवर शनीचा प्रभाव असेल कारण त्यांचा स्वामी शनि असतो. धार्मिक मान्यतेनुसार कुंभ रास असणाऱ्या लोकांनी ब्रह्मचारिणीच्या पूजेसोबत सप्तशतीचा पाठही करावा. असे केले तर त्या व्यक्तीला आर्थिक लाभ होईल.