Lakshmi Arrival Sign : सावधान! चुकूनही ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, नाहीतर देवी लक्ष्मी होईल नाराज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lakshmi Arrival Sign : ग्रह आणि ताऱ्यांसोबत आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्योतिषशास्त्रात देवी लक्ष्मीबाबत बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. समजा तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असेल तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही.

अशावेळी रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. परंतु काहीवेळा देवी लक्ष्मी आपल्या घरी आली आहे, ते आपल्याला कळत नाही. इतकेच नाही तर आपल्याकडून नकळत काही चुका घडतात आणि देवी लक्ष्मी घरातून निघून जाते. देवी लक्ष्मीचा आपल्या घरात वास असल्याचे काही संकेत देखील असून ते ओळखून तुम्ही वागणं ठेवले तर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की मिळतो. कोणते आहेत हे संकेत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

हे आहेत देवी लक्ष्मी मातेच्या आगमनाचे संकेत

  • ज्योतिषशास्त्रानुसार, चांगले दिवस सुरू होण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला देव, झाडे, खजिना, वनस्पतीची स्वप्ने पडायला सुरुवात होतात. जे लवकरच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होणार असल्याचे पूर्व संकेत देतात.
  • ज्योतिषशास्त्रानुसार, चांगला दिवस सुरू होण्यापूर्वी घरातील झाडे हिरवाईने टवटवीत दिसू लागतात. विशेषत: घरामध्ये लावण्यात आलेले तुळशीचे रोप आणखी हिरवे आणि सुंदर दिसायला लागते.
  • इतकेच नाही तर घराच्या परिसरात लावण्यात आलेले केळीचे झाड आणि मनी प्लांट देखील हिरवेगार दिसायला सुरुवात होते. ज्योतिष शास्त्रामध्ये हे चिन्ह सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तज्ज्ञांच्या मतानुसार, हे घरात लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण असण्याची शक्यता असते.
  • ज्योतिषशास्त्रानुसार, समजा काळ्या मुंग्यांचा समूह अचानक घरात दिसल्यास तर अशी पूर्वकल्पना आहे की देवी लक्ष्मीचे लवकरच घरात आगमन होणार आहे. इतकेच नाही तर पहाटे शंखध्वनी ऐकणे हे देखील लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण असून अशा परिस्थितीत तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये.