पारनेर नगराध्यक्षपदासाठी लंकेना एका नगरसेवकाची आवश्यकता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  पारनेर नगर पंचायतची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष बनून समोर आला आहे.

मात्र कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मात्र आता पारनेर नगरपंचायतच्या नगरसेविका सुरेखा अर्जुन भालेकर यांनी आज सकाळी आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे पक्षीय बलाबल 8 वर जाऊन पोचले आहे.

बहुमतासाठी आता राष्ट्रवादीला एका नगरसेवकाची आवश्यकता आहे. बुधवारी निकालानंतर आमदार नीलेश लंके यांनी आमचे सात नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल. असा आत्मविश्वास व्यक्त केला होता.

आत त्यांचे आठ सदस्य, झाल्याने पुन्हा एकदा आमदार लंके यांनी नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. बलाबल… पारनेर नगर पंचायतमध्ये 17 नगरसेवक आहेत.

त्यातील राष्ट्रवादीचे 7, शिवसेनेचे 6, अपक्ष 1, शहर विकास आघाडी 2 तर भाजपचा 1 नगरसेवक आहे. सत्ता मिळविण्यासाठी 9 नगरसेवकांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष एक नगरसेविकेने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.