Auto Expo 2023 : ‘या’ दिवशी लाँच होणार मारुती ब्रेझा सीएनजी, जाणून घ्या किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Auto Expo 2023 : नुकतीच ऑटो एक्स्पोमध्ये मारुती सुझुकीने ब्रेझा सीएनजी सादर केली आहे. दरम्यान कंपनीने यापूर्वी Grand Vitara ही CNG SUV लाँच केली होती. आता ही कंपनीची दुसरी CNG SUV आहे.

लवकरच मार्केटमध्ये ही नवीन कार धुमाकूळ घालताना दिसेल. या कारची किंमतही कंपनीने जाहीर केली आहे. जाणून घेऊयात मायलेजपासून ते किमतीपर्यंत सर्वकाही.

सादर केली CNG Brezza

कंपनीने ऑटो एक्सपो 2023 मध्ये CNG Brezza सादर केली आहे. आता कंपनी लवकरच ब्रेझा सीएनजी प्रकारासह लॉन्च करण्याची शक्यता आहे.

कसा आहे लूक

मारुती ब्रेझा सीएनजी आणि पेट्रोल व्हेरियंटच्या लुकमध्ये फारसा फरक नाही. पेट्रोल रिफिल पॉइंटसोबत फक्त सीएनजी रिफिल पॉइंट दिला आहे. तसेच एसयूव्हीच्या ट्रंकमध्ये सीएनजी सिलिंडर बसवला आहे. पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटमधील फरक कारच्या विंडशील्ड आणि मागील मिररवरील सीएनजी स्टिकरद्वारेच केला जाऊ शकतो.

इंजिन

या एसयूव्हीच्या इंजिनमध्ये फारसा बदल होणार नाही. 1.5-लिटर इंजिन जे सध्याच्या पेट्रोल प्रकारात दिले जाते. त्याच इंजिनसह काही तांत्रिक बदल करून ब्रेझा सीएनजीसोबत आणली जाईल.

कधी होणार लाँच

लॉंचबाबत अधिकृत माहिती कंपनीकडून दिली नाही. परंतु,येत्या तीन ते सहा महिन्यांत ही एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

किंमत

सध्याच्या पेट्रोल प्रकारासह Brezza ची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते. आता सीएनजी वेरिएंटबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने अद्याप त्याची माहिती दिलेली नाही, परंतु सीएनजी वेरिएंटसह ब्रेझाची एक्स-शोरूम किंमत पेट्रोल व्हेरियंटपेक्षा 70 ते 80 हजार रुपये जास्त असण्याची शक्यता आहे.