PF Balance Check : खात्यात आले लाखो रुपये! अशाप्रकारे करा चेक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PF Balance Check : जर एखादी नोकरी केली तर महिन्याला त्या कर्मचाऱ्याच्या पगाराचा काही भाग भविष्य निर्वाह निधीत जमा केला जातो. याच नोकरदारवर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण पीएफ कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाचे पैसे आले आहेत. किती पैसे आले ते तपासण्यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही शिल्लक तपासू शकता.

तुम्ही आता आरामात घरच्या घरीच तुमची शिल्लक तपासू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही.

इतके आले व्याज

खाजगी किंवा सरकारी कंपनीत काम करत असताना पीएफचे पैसे कट केले जातात. त्यानंतर त्या व्याजाची रक्कम खात्यात जोडली जाते. यावेळी 8.1 टक्के इतके व्याजाचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.जर तुमच्या खात्यात 5 लाख रुपये आले असतील तर तुम्हाला 8.1 टक्के व्याज दराने 41,000 रुपये पाठवले आहेत.

अशी तपासा रक्कम

ईपीएफओने अनेक प्रकारच्या सुविधा सुरू केल्या आहेत. एसएमएस, मिस्ड कॉल, उमंग अॅप आणि ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटद्वारे तुम्ही शिल्लक तपासू शकता.

अशाप्रकारे अॅपद्वारे जाणून घ्या

तुम्ही UMANG अॅपवर तुमची शिल्लक तपासू शकता. यामध्ये UAN आणि OTP वापरून लॉग इन करून EPF शिल्लक तपासू शकता तसेच तुमचे PF पासबुक मिळवू शकता.