Monsoon Update : आनंदवार्ता ! पुढील ५ दिवस या राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update : सध्या देशात आणि राज्यात मान्सून चे (Monsoon) आगमन होऊ लागले आहे. त्यामुळे कडाक्याच्या उष्णतेपासून (heat) सर्वांनाच दिलासा मिळत आहे. यावेळेस मान्सून लवकर आल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर हवामान विभागाकडून (Meteorological Department) मान्सूनबाबत चांगली बातमी देण्यात आली आहे.

दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह उष्णतेशी झुंज देणारी उत्तर भारतातील राज्ये सध्या मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. नैऋत्य मान्सून (Southwest monsoon) मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, पूर्व गोवा, कोकणचा काही भाग आणि

कर्नाटकच्या काही भागात पुढे सरकला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्याचबरोबर काही राज्यांमध्ये पुढील ५ दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य भारत आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची (Heavy rain) शक्यता आहे. त्याचबरोबर बिहार आणि झारखंडमध्ये पुढील दोन दिवस पाऊस पडू शकतो.

मान्सून मुंबईत दाखल

मुंबईत मान्सूनची एन्ट्री (Mumbai Monsoon Entry) झाल्याची माहिती हवामान खात्याने ट्विट करून दिली आहे. मुंबईच्या काही भागात आज पाऊस झाला. मुंबईत मान्सूनची एन्ट्री झाल्यानंतर आता दिल्लीतील लोकांना पावसाची प्रतीक्षा आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार मान्सूनची प्रगती चांगल्या गतीने होत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 14 जूनपर्यंत पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस सुरू राहणार आहे. आज मुंबईत किमान तापमान 26 अंश तर कमाल तापमान 34 अंशांवर पोहोचले आहे.

उष्णतेची लाट या भागात दाखवणार रंग

अनेक राज्यांमध्ये पाऊस अपेक्षित असताना, पुढील दोन दिवस उत्तर-पश्चिम, मध्य आणि लगतच्या पूर्व भारताच्या वेगळ्या भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.