Narak Chaturdashi : यंदाच्या नरक चतुर्दशीला जरूर करा ‘या’ पाच गोष्टी, तुमच्या सर्व मनोकामना होतील पूर्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Narak Chaturdashi : नरक चतुर्दशीलाच छोटी दिवाळी (Small Diwali) म्हणूनही ओळखतात. यावर्षी 24 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi in 2022) साजरी केली जाणार आहे.

यंदाच्या दिवाळीत (Diwali in 2022) जर तुमच्या काही मनोकामना पूर्ण करायच्या असतील नरक चतुर्दशी दिवशी (Narak Chaturdashi 2022) काही गोष्टी आवर्जून करा.

उटणे

नरक चतुर्दशीला रूप चौदस असेही म्हणतात. या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर उटणे लावले जाते. त्यानंतर पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून आंघोळ केली जाते.

यमदेवाच्या नावाने दिवा लावावा

छोटी दिवाळीच्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते. या दिवशी (Deepavali) संध्याकाळी घराच्या दारात यमदेवाच्या नावाचा दिवा लावला जातो. असे मानले जाते की यमदेवासाठी दिवा लावल्याने कुटुंबातील सदस्यांचा अकाली मृत्यू होत नाही.

14 दिवे लावा

नरक चतुर्दशीच्या दिवशी यमाच्या नावाने दिवा लावण्याबरोबरच सूर्यास्तानंतर घराच्या दारात दक्षिण दिशेला तोंड करून चौदा दिवे लावावेत. त्यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतात.

भगवान श्रीकृष्णाची पूजा

भगवान श्रीकृष्णाने छोटी दिवाळीच्या दिवशी नरकासुराचा वध केला. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करणे शुभ मानले जाते. छोटी दिवाळी निमित्त श्री कृष्णाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात.

कालिका मातेची विशेष पूजा

नरक चतुर्दशीला काली चौदस म्हणतात. या दिवशी कालिका देवीची पूजा केली जाते. देवी कालिकेची उपासना केल्याने दुःख दूर होते आणि मनोकामना पूर्ण होतात.