लसीकरणाच्या मुद्द्यावरून महसूलमंत्र्यांनी केंद्रावर साधला निशाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव देशासह राज्यात कायम आहे. यातच लसीकरण हा एक आशेचा किरण दिसू लागला.

यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवण्यात आली. मात्र अनेकदा लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्य सरकार व केंद्र सरकार मध्ये आरोप- प्रत्यारोप होत.

मात्र आता नुकतेच ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (७ जून) देशातील लसीकरणाची अखेर जबाबदारी घेतली हा निर्णय चांगला आहे.

परंतु हा निर्णय घेण्यास उशीर झाला आहे,’ असे वक्तव्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. दरम्यान लसीकरणाच्या मुद्द्यावरून केंद्राकडून नेहमी राज्याला धारेवर धरले जात होते.

मात्र ‘राज्यांवर जबाबदारी ढकलून नामानिराळे राहिलेल्या मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने धारेवर धरून लसीकरण मोहिमेची सर्व माहिती मागवताच केंद्र सरकारला जाग आली, आणि केंद्र सरकारने लसीकरणाची जबाबदारी घेतली,’असा टोलाही थोरात यांनी लगावला.

देशात आतपर्यंत ज्या लसीकरण मोहिमा झाल्या त्यांची जबाबदारी केंद्र सरकारांनीच घेतली होती. परंतु मोदी सरकारने आपली जबाबदारी राज्यांवर ढकलून पळ काढला होता.

देशभरातून केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणांवर टीका होऊ लागली आणि सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावर आता नाईलाजाने लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे.’