OnePlus Smartphone Offer : ‘इतक्या’ सवलतीत खरेदी करा OnePlus फोन, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus Smartphone Offer : भारतीय बाजारात प्रत्येक वर्षी OnePlus चे अनेक स्मार्टफोन लाँच होत असतात. कंपनी आपल्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे फीचर्स देत असते. कंपनी आता 5G स्मार्टफोन लाँच करत आहेत. इतर स्मार्टफोनपेक्षा OnePlus च्या किमती महाग असतात.

अनेकांचे बजेट जास्त असतेच असे नाही. तुम्ही आता OnePlus Nord N20 SE आणि OnePlus Nord CE 2 Lite 5G हे स्मार्टफोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. Amazon सेलमध्ये अशी संधी मिळत आहे.

OnePlus Nord N20 SE ऑफर

स्टोरेजचा विचार केला तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनची मूळ किंमत 21,990 रुपये इतकी आहे. सेलमध्ये तुम्ही हा फोन 28% डिस्काउंटनंतर 15,900 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच बँक ऑफरमध्ये कंपनी या फोनवर 1,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत देत ​​आहे.

या सवलतीसाठी तुम्हाला SBI कार्डद्वारे पैसे द्यावे लागणार आहेत. तसेच 771 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर हा फोन तुम्ही खरेदी करू शकता. याच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर कंपनी फोनमध्ये 6.56 इंचाचा HD डिस्प्ले देत असून या फोनचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. सेल्फीसाठी तुम्हाला या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि बॅटरी 5000mAh आहे, जी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

OnePlus Nord CE 2 Lite 5G ऑफर

या फोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज सह येईल. या फोनची मूळ किंमत 17,999 रुपये इतकी आहे. Amazon डीलमध्ये, तुम्हाला 17,999 रुपयांमध्ये डिस्काउंटनंतर खरेदी करता येईल. बँक ऑफरमध्ये या फोनवर 1,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सवलत मिळेल.

त्याचा EMI 873 रुपयांपासून सुरू होतो. या फोनवर 16,400 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीवर अवलंबून असते. या फोन मध्ये तुम्हाला 2412×1080 पिक्सेल रिझोल्युशन सह 6.59 इंच डिस्प्ले दिला जात असून हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले आहेत. यात 2-मेगापिक्सेल डेप्थ लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्ससह 64-मेगापिक्सेल मुख्य लेन्स आहे. तुम्हाला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरवर काम करणाऱ्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 33 वॅटची सुपरफास्ट चार्ज आहे.