OPPO Find N3 Flip : 35849 रुपयांना खरेदी करा Oppo चा फोल्डेबल फोन, होईल हजारोंची बचत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OPPO Find N3 Flip : स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता OPPO Find N3 Flip हा फोन अतिशय कमी किमतीत खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारोंची बचत होऊ शकते.

स्टोरेजचा विचार केला तर फोन हा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह एकाच प्रकारात लॉन्च केला असून त्याची किंमत 94,999 रुपये इतकी आहे. हा फोन क्रीम गोल्ड, मिस्टी पिंक, स्लीक ब्लॅक कलर पर्यायांत येतो. तुम्हाला बँक ऑफरचा लाभ घेऊन 12,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल.

तसेच फ्लिपकार्ट या फोनवर 47,150 रुपयांपर्यंतचा एक्स्चेंज बोनस देत आहे, तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असेल आणि त्यावर पूर्ण एक्सचेंज बोनस आणि बँक ऑफरचा लाभ घेण्यात यशस्वी झाला, तर फोनची किंमत रु. 35,849 असेल. याचा असा अर्थ लॉन्च किमतीपेक्षा 59,150 रुपयांनी कमी किमतीत खरेदी करता यर्नार आहे.

खासियत

Oppo च्या या फोनमध्ये 3.26-इंच वर्टिकल कव्हर स्क्रीन दिली असून जी Gmail, Google Calendar, YouTube आणि WhatsApp सारख्या लोकप्रिय अॅप्ससह 40 पेक्षा जास्त तृतीय-पक्ष अॅप्सला सपोर्ट करते, यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

या फोनचे वजन 198 ग्रॅम असून यामध्ये 6.8 इंचाचा मुख्य डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फुल एचडी प्लस LTPO AMOLED पॅनेल असून त्याचा रिफ्रेश दर 120 Hz पर्यंत असेल. यात Dolby Atmos सह ड्युअल स्पीकर सेटअप उपलब्ध आहे.

तीन रियर कॅमेरे असणारा हा पहिला फ्लिप फोल्ड फोन असून यात फोटोग्राफीसाठी, हॅसलब्लॅड समर्थित ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 48-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2x ऑप्टिकल झूम असणारा 32-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सेल लेन्स असेल.

हा फोन MediaTek Dimension 9200 प्रोसेसरने सुसज्ज असून यात 44W SuperVooc फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4300mAh बॅटरी दिली आहे. हा फोन 56 मिनिटांत 0 ते 100% पर्यंत चार्ज होईल. फोन 50 टक्के चार्ज होण्यासाठी 23 मिनिटे लागतात. फक्त 15 मिनिटे चार्ज करून तुम्ही फोनवर चार तास व्हिडिओ पाहू शकता. यात 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.3, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट फीचर्स पाहायला मिळतील.