Oppo Upcoming Smartphone : 100W चार्जिंग सपोर्टसह ‘या’ दिवशी भारतीय बाजारात लाँच होणार ओप्पोचा शक्तिशाली फोन, किंमत असणार फक्त..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Oppo Upcoming Smartphone : लवकर चार्ज होणारा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत ओप्पो आहे. कंपनी आपला आगामी स्मार्टफोन सीरिज Oppo Reno 10 Series लाँच करण्याच्या तयारीत आहे.

कंपनीच्या या सीरिजमध्ये Oppo Reno 10 मॉडेल, Oppo Reno 10 Pro आणि Oppo Reno 10 Pro+ असे तीन स्मार्टफोन असणार आहे. परंतु अशातच Oppo Reno 10 Pro+ च्या स्मार्टफोनचे डिझाईन लीक झाले आहे. 100W चार्जिंग सपोर्टसह हा फोन लवकरच भारतीय बाजारात लवकरच धुमाकूळ घालताना दिसणार आहे.

असे असेल डिझाइन

नुकतेच या फोनचे एका पोस्टद्वारे डिझाइन रेंडर शेअर करण्यात आले आहे. शेअर करण्यात आलेल्या प्रतिमा काळ्या रंगाच्या प्रकारात हँडसेट दर्शवतात. या फोनच्या मागील पॅनलवर एक लंबवर्तुळ कॅमेरा मॉड्यूल देण्यात आले आहे, ज्यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. तर सेल्फी कॅमेर्‍यासाठी डिस्प्लेच्या वरच्या बाजूला सेंटर पंच होल कटआउट असणार आहे.

मिळणार जलद चार्जिंग बॅटरी

एका अहवालानुसार, मॉडेल क्रमांक PHU110 सह Oppo Reno 10 Pro+ देखील 3C सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसून आला आहे. या सूचीवरून असे दिसून आले आहे की 5G सपोर्ट असणारा हा फोन 100W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकेल.

जाणून घ्या स्पेसिफिकेशन..

कंपनीच्या आगामी Reno 10 Pro Plus मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.74-इंच 1.5K AMOLED डिस्प्ले पॅनेल असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर असेल. स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 12GB रॅम आणि 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज असेल.

तर फोटोग्राफीसाठी, यात 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि आणखी 64-मेगापिक्सेलचा सेन्सर असेल. फ्रंट कॅमेरा 32-मेगापिक्सल सेन्सरने सुसज्ज असेल.

सूची चार्जिंग क्षमतेवर संकेत देत असली तरी बॅटरी क्षमतेबद्दल काही सांगत नाही. असे असले तरी या अहवालात असा अंदाज आहे की आगामी Oppo Reno 10 Pro Plus 4800mAh ड्युअल-सेल बॅटरी युनिटसह सुसज्ज असून हे USB टाइप-सी पोर्टसह येईल.