Petrol Diesel Price : आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price : देशातील इंधनाच्या किमती गगनाला पोहोचल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अनेकजण तर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत.

अशातच आता सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. कारण आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरात किती दर आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सरकारी तेल कंपन्यांनी शनिवार 17 डिसेंबर 2022 साठी पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. किमतींनुसार पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नसल्याने सलग 207 व्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर

मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कमालीची नरमाई दिसून येत आहे. डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत प्रति बॅरल $74 पर्यंत खाली आली आहे तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल सुमारे $ 81 इतकी आहे.

जुलै 2008 नंतर या वर्षी म्हणजे मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $140 वर पोहोचल्या आहेत. तेव्हापासून 46 टक्क्यांच्या घसरणीसह, ते प्रति बॅरल $76 च्या जवळ व्यापार करत असून ही या वर्षातील सर्वात कमी पातळी आहे. कच्च्या तेलाचा लीटर आणि रुपयाच्या संदर्भात अंदाज लावला तर 9 महिन्यांत किंमत 33 रुपयांपेक्षा जास्त कमी झाली पाहिजे. यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीच कपात झाली नाही.

केंद्र सरकारने या अगोदर म्हणजे 21 मे रोजी उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये तर डिझेलवर उत्पादन शुल्कात 6 रुपयांनी कपात केली होती.

त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाली होती. यानंतर देशात पेट्रोलचे दर 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले. सरकारच्या या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.

देशातील महानगरांमध्ये ही आहे किंमत

दिल्लीमध्ये सध्या पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. यासोबतच चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

येथे मिळतेय सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल

राजस्थानातील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल विकले जात आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे. तर हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

येथे मिळत आहे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल

पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. येथे पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.

जाणून घ्या आजचे दर

दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

बंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.

तिरुअनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.

भुवनेश्वर: पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.

चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.

लखनौ : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.

नोएडा: पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.

जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.

पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

गुरुग्राम: 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.

यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत

पेट्रोल -डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जवळपास दुप्पट होते. त्यामुळे परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर अवलंबून पेट्रोलआणि डिझेलच्या किमती रोज बदलल्या जातात.

असे जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

पेट्रोल आणि डिझेलचे दररोज सकाळी 6 वाजता अपडेट होतात. तर पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे समजू शकतात. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर शहर कोडसह RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक 9223112222 वर RSP पाठवू शकतात. त्याचबरोबर, HPCL ग्राहक HP Price 9222201122 वर पाठवून दर जाणून घेऊ शकतात.