पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : मागील काही दिवसांमध्ये देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी केले होते. तसेच देशातील अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केली नव्हते. आता आपण पेट्रोल ५ आणि डिझेल ३ रुपयांची दर कपात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणीच्या दिवशीच इंधनदर कपात करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावर आज निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने पेट्रोल डिझेल VAT कमी केला आहे. त्यामुळे आता पेट्रोल प्रती लिटर ५ रुपये आणि डिझेल प्रती लिटर ३ रुपयांनी स्वस्त होणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर ६ हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.