Petrol Diesel Price : तेल कंपन्यांनी जाहीर केल्या इंधनाच्या नवीन किमती, झटपट जाणून घ्या नवीनतम दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel Price : देशभरात इंधनाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महागाई वाढत असताना सर्वसामान्य जनतेचे वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे खिशावर आर्थिक ताण पडत आहे. त्यामुळे त्यांचे महिन्याचे बजेट कोलमडत आहे.

सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर करत असतात. आजही या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केला नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

देशातील शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर

सध्या दिल्ली येथे पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर आहे. मुंबई शहरामध्ये पेट्रोल 106.31रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये तसेच डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. तर दुसरीकडे, चेन्नई येथे पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

या ठिकाणी मिळत आहे सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल

राजस्थानातील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात जास्त महाग पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. गंगानगर जिल्ह्यात पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर तसेच हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर आहे.

या ठिकाणी मिळत आहे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल

पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. या ठिकाणी पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.

जाणून घ्या आजचे दर

दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

बंगळुरू : पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.

तिरुअनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.

भुवनेश्वर: पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.

चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.

लखनौ : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.

नोएडा: पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.

जयपूर : पेट्रोल १०८.४८ रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.

पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

गुरुग्राम: 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.

जाणून घ्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किमती

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $80 आणि ब्रेंट क्रूड $85 प्रति बॅरलच्या जवळ गेले आहे. जुलै 2008 नंतर या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $140 वर गेले आहे. त्यामुळे देशात पेट्रोल तसेच डिझेलच्या किमतीत कोणतेही घट झाली नाही.

उत्पादन शुल्कात कपात

केंद्र सरकारकडून याअगोदर 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या आजच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये तसेच डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली आहे. त्यानंतर पेट्रोल तसेच डिझेलच्या दरात घट झाली होती. देशात यानंतर डिझेल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारकडूनही व्हॅटमध्ये कपात करण्यात आली होती.