Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या की कमी झाल्या? आत्ताच पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel Price : भारतीय तेल कंपन्यांनी आज नवीन पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. दरम्यान आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केला नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

मागील काही दिवसांपासून इंधनाच्या किमतीत झपाटयाने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कधी कमी होणार याकडे या नागरिकांचे लक्ष लागले आहे. आज देशात पेट्रोल आणि डिझेल कोणत्या दराने विकले जात आहे जाणून घ्या.

काय आहे देशातील महानगरांमधील पेट्रोल डिझेलचा दर

सध्या दिल्ली येथे पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर आहे. मुंबई येथे पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये तसेच डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर दुसरीकडे, चेन्नई येथे पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेलची 94.24 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे.

येथे मिळत आहे सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल

राजस्थान येथील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात जास्त महाग पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. गंगानगर जिल्ह्यात पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे. हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर दराने विक्री
केली जात आहे.

या ठिकाणी मिळत आहे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल

पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेलउपलब्ध आहे. जिथे पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर इतका आहे.

जाणून घ्या आजची किंमत

दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

हैदराबाद: पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

बंगळुरू : पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.

तिरुअनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.

भुवनेश्वर: पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.

चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.

लखनौ : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.

नोएडा: पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.

जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.

पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

गुरुग्राम: 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.

ही आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या तेजीनंतर डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $70 आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $76 च्या जवळ पोहोचले आहे. जुलै 2008 नंतर या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $140 वर पोहोचल्या आहेत. यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही घट झालेली नाही.

उत्पादन शुल्कात झाली कपात

केंद्र सरकारकडून या अगोदर 21 मे रोजी पेट्रोल डिझेलच्या आजच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली होती. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले होते. केंद्राच्या या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली होती.