Petrol-Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झाली वाढ, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर (Crude oil prices) प्रति बॅरल 120 डॉलरवर पोहोचले असले तरी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol and diesel prices) महिनाभरापासून स्थिर आहेत.

त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. भारतीय तेल कंपन्यां (Indian oil companies) नी आज (सोमवार) 20 जून रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

यापूर्वी 21 मे रोजी मोदी सरकारने उत्पादन शुल्कात शेवटची कपात केली होती, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले होते.

दरम्यान कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी उसळी घेतल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ होत नसल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भारतीय पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज 20 जून रोजी पेट्रोल 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर, चेन्नईमध्ये 102.63 रुपये प्रति लिटर आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर इतका आहे.

आंतरराष्‍ट्रीय बाजारातील कच्‍च्‍या तेलच्‍या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्‍या किमतींचा आढावा घेतल्‍यानंतर दर ठरवतात. भारतातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलची किंमत तुम्हाला दररोज एसएमएसद्वारे कळू शकते. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

राज्य स्तरावर पेट्रोलवर लावल्या जाणाऱ्या कर (Tax) मुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये किंमती भिन्न आहेत. महाराष्ट्र (Maharashtra), आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पेट्रोलवर सर्वाधिक कर आहे.