PM Kisan Yojana : ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही बाराव्या हप्त्याचे पैसे, तपासा तुमचे नाव यादीत आहे का?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana : केंद्र सरकारकडून (Central Govt) पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दर चार महिन्यांनी पैसे जमा केले जातात. सरकारने आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हफ्ते जमा केले आहेत.

सध्या शेतकरी 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 12 वा हफ्ता येण्यापूर्वी काही शेतकऱ्यांचे पैसे (Money) अडकू शकतात.

या शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळू शकणार नाही:-

  1. जर तुम्ही संस्थागत शेतकरी असाल.
  2. तुमच्याकडे दोन हेक्टरपर्यंत जमीन असल्यास जी लागवड करण्यायोग्य आहे.
  3. जर तुमचे नाव राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या भूमी अभिलेखात नोंदवले गेले असेल.
  4. जर तुम्ही केंद्र किंवा राज्य सरकारच्या (State Govt) अंतर्गत कार्यालये, मंत्रालये किंवा कोणत्याही विभागात सेवारत किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असाल.
  5. नोंदणीमध्ये काही चूक असल्यास.
  6. आधार कार्ड (Aadhar Card) आणि फॉर्ममधील नाव चुकीचे किंवा वेगळे असल्यास.

या लोकांचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने यापूर्वीच ई-केवायसी (E-KYC) अनिवार्य केले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल किंवा तुम्ही हे काम 31 ऑगस्ट 2022 (अंतिम तारीख) पर्यंत पूर्ण केले नाही तर तुमचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात.

लाभार्थी त्यांचे नाव याप्रमाणे यादीत तपासू शकतात:-

स्टेप 1

  • प्रथम अधिकृत पोर्टलला भेट द्या https://pmkisan.gov.in/
  • त्यानंतर ‘फॉर्मर कॉर्नर’ हा पर्याय निवडा.
  • आता ‘बेनिफिशियरी लिस्ट’ वर क्लिक करा.

स्टेप 2

  • यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि तुमच्या गावाची माहिती टाका
  • त्यानंतर ‘Get Report’ वर क्लिक करून तुम्ही लाभार्थी यादीत (Beneficiary list) तुमचे नाव तपासू शकता.