Poco F5 Series : शक्तिशाली प्रोसेसरसह ‘या’ दिवशी भारतात लॉन्च होणार Poco F5, कमी किमतीत मिळणार शानदार फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Poco F5 Series : स्मार्टफोन निर्माता कंपनी पोको भारतात लवकरच आणखी एक स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीची लवकरच पोको एफ5 सीरीज लाँच केली जाणार आहे. माहितीनुसार या सिरीजमध्ये Poco F5 आणि Poco F5 Pro या दोन तगड्या स्मार्टफोनचा समावेश असणार आहे.

कंपनी आगामी स्मार्टफोनमध्ये म्हणजे Poco F5 यात Snapdragon 7 Plus Gen 2 SoC प्रोसेसर देणार आहे. यात 8GB आणि 12GB रॅमचे पर्याय मिळेल तसेच या फोनची किंमत 35 हजार रुपयांपेक्षा कमी असेल.

जर लीक्सवर विश्वास ठेवायचा झाल्यास Poco F5 या सीरिजमध्ये Poco F5 आणि Poco F5 Pro यांचा समावेश असणार आहे. कंपनीचा Poco F5 हा फोन Snapdragon 7 Plus Gen 2 SoC प्रोसेसरसह असू शकतो.

या दिवशी लॉन्च होणार Poco F5

Poco F5 स्मार्टफोन 9 मे 2023 रोजी भारतात लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच यासोबत Poco F5 Pro देखील लॉन्च करण्यात येईल. हा फोन लॉन्च झाल्यानंतर काही दिवसांनी Poco F5 सीरीजची विक्री सुरू होईल.

जाणून घ्या POCO F5 ची किंमत

स्टोरेजचा विचार केला तर Poca F5 स्मार्टफोन 256GB स्टोरेजसह भारतात दाखल होऊ शकतो. तसेच रॅम ऑप्शनबद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये 8GB आणि 12GB रॅमचे पर्याय मिळेल. या फोनची किंमत 35 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. तर लीकनुसार, या फोनमध्ये काळा, पांढरा आणि निळा रंग पर्याय कंपनी देऊ शकेल .

जाणून घ्या स्पेसिफिकेशन

कंपनीच्या आगामी Poca F5 मध्ये 6.67-इंचाचा 12-बिट 120Hz OLED डिस्प्ले असेल. हा फोन Android 13 वर आधारित MIUI 14 सह फोन साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकरसह येईल. असे सांगण्यात येत आहे की यात Snapdragon 7 Plus Gen 2 SoC प्रोसेसर असेल, जो या प्रोसेसरसह भारतातील पहिला फोन असणार आहे.

कंपनीच्या या फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी असणार आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध असणार आहे. यात OIS सह 64MP प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर तसेच यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असणार आहे.