Post Office आरडी योजनेच्या मदतीने 10 लाख रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल ? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office RD Scheme : पोस्ट ऑफिस ची आरडी ही एक लोकप्रिय बचत योजना आहे. अनेक जण या योजनेत गुंतवणूक करतात. अलीकडे भारतात गुंतवणुकीसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एफडी योजना, आरडी योजना पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिस ची आरडी योजना आणि एफडी योजना इत्यादी पर्याय गुंतवणूकदारांपुढे आहेत.

याशिवाय रिअल इस्टेट, सोने-चांदी इत्यादी ठिकाणी गुंतवणूक करणे देखील सुरक्षित मानले जाते. दरम्यान आजची ही बातमी पोस्ट ऑफिसच्या आरडी या सुरक्षित बचत योजनेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी खूपच खास राहणार आहे.

कारण की आज आपण पोस्ट ऑफिस च्या RD योजनेतून जर 10 वर्षाच्या कालावधीत दहा लाख रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर या योजनेत किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल याबाबत थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत किती व्याज मिळते ?

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारखे अनिश्चित रिटर्न मिळत नाहीत. म्हणजेच येथे गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना फिक्स रिटर्न मिळू शकतात. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये अनेकदा गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळतो.

परंतु या योजनांमध्ये नुकसान होण्याची शक्यता देखील नाकारून चालत नाही. त्यामुळे अनेक जण आजही पोस्ट ऑफिसच्या आरडीत गुंतवणूक करणे विशेष फायद्याचे असल्याचे बोलतात.

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेबाबत बोलायचं झालं तर या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या स्थितीला 6.7% एवढे व्याजदर दिले जात आहे.

अशा परिस्थितीत जर असेच व्याजदर आगामी काही वर्ष कायम राहील तर दहा लाख रुपयाचा फंड काही वर्षातच जमवला जाऊ शकतो.

10 लाख रुपयाचा फंड जमा करण्यासाठी कितीची गुंतवणूक? 

आरडी कॅल्क्युलेटर नुसार, पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीम मधून दहा वर्षाच्या कालावधीत 10 लाख रुपयाचा फंड जमा करण्यासाठी 5900 दर महिन्याला गुंतवावे लागणार आहेत.

या कालावधीत गुंतवणूकदार सात लाख आठ हजार रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तसेच यावर तीन लाख रुपयांचे व्याज मिळणार आहे.

म्हणजेच 5900 रुपयांची गुंतवणूक केल्यास दहा वर्षांनी या योजनेतून दहा लाख आठ हजार रुपयांचा मोठा फंड जमा होऊ शकणार आहे. निश्चितच ज्यांना सुरक्षित गुंतवणूक करायची आहे यांच्यासाठी पोस्ट ऑफिस ची आरडी ही बचत योजना खूपच फायदेशीर ठरणार आहे.