Post Office TD : गुंतवणूकदारांनो! ‘या’ ठिकाणी मिळत आहे बँक एफडीपेक्षा जास्त व्याज, लगेचच करा गुंतवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office TD : सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खाजगी योजनेत गुंतवणूक करू शकता. अनेकजण पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसमध्ये सर्व वयोगटासाठी योजना उपलब्ध आहेत.

येथे बँक एफडीपेक्षा जास्त व्याज मिळते. या योजनेमध्ये सर्वात जास्त परतावा मिळतो. इतकेच नाही तर या योजनांमध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यावी लागत नाही. त्यामुळे अनेकजण या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. जाणून घ्या सविस्तर माहिती.

इतकेच नाही तर समजा कोणी पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांसाठी एफडी करत असल्यास तर त्याला आयकर सवलतीचा लाभ दिला जातो. गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला आयकराच्या कलम 80C अंतर्गत या ठेवीवर सवलत मिळते.

जाणून घ्या पोस्ट ऑफिस टीडी नवीनतम दर

गुंतवणूकदारांना 1 वर्षाच्या मुदत ठेव योजनेवर 6.9 टक्के इतके व्याज मिळेल.
गुंतवणूकदारांना 2 वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 7.0 टक्के इतके व्याज मिळेल.
गुंतवणूकदारांना 3 वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 7.0 टक्के इतके व्याज मिळेल.
गुंतवणूकदारांना 5 वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 7.5 टक्के इतके व्याज मिळेल.

कमी गुंतवणुकीत मिळेल जास्त व्याज

तुम्ही आता पोस्ट ऑफिसचे टीडी खाते कमीत कमी 200 रुपयांमध्ये उघडता येते. परंतु जास्तीत जास्त ठेवींवर मर्यादा नसते हे लक्षात ठेवा. तुम्ही पोस्ट ऑफिस टीडी खात्यात एकल आणि संयुक्त नावाने पैसे जमा जर शकता, इतकेच नाही तर यात नॉमिनेशनची सुविधाही उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिस टीडी खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करू शकता.

हे लक्षात घ्या की तुम्ही पोस्ट ऑफिस टीडी खात्याअंतर्गत एकापेक्षा जास्त खाती चालू करू शकता. तुम्ही पोस्ट ऑफिस टीडी खात्यातून पैसे पोस्ट ऑफिस सीबीएसई शाखांमधून कोठूनही काढू शकता. समजा पोस्ट ऑफिस टीडी खाते पूर्ण झाल्यानंतर लोकांनी पैसे काढले नाहीत तर ते आपोआप रिन्यू करण्यात येतात. ज्या कालावधीसाठी ते सर्वात अगोदर सुरू केले होते त्याच कालावधीसाठी त्याचे नूतनीकरण केले जाते. पोस्ट ऑफिसमध्ये एफडी सुविधा देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये मिळते.