Realme Narzo N55 : ओप्पोला टक्कर देतोय ‘हा’ शक्तिशाली फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Realme Narzo N55 : सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने Narzo सीरीज नुकतीच लाँच केली आहे. ही सीरिज ओप्पोला जबरदस्त टक्कर देत आहे. कंपनी बऱ्याच दिवसांपासून या सीरीजवर काम करत होती. इतकेच नाही तर कंपनीचे चाहते देखील या फोनची आतुरतेने वाट पाहत होते.

कंपनीने हा फोन लाँच करण्यापूर्वी यांचे डिजाइन अधिकृतपणे टीज केले होते. यात कंपनीकडून 5000 mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. इतकेच नाही तर कंपनीने यात जबरदस्त फीचर्सही दिले आहेत. जाणून घ्या कंपनीच्या या फोनची किंमत.

दोन प्रकारांत झाला लॉन्च

कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन दोन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्च केला आहे. यात एक 4GB + 64GB आणि दुसरा 6GB + 128GB उपलब्ध असून कंपनीने या फोनमध्ये मिनी कॅप्सूल फीचरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. याच्या मदतीने तुम्हाला चार्जिंग तसेच डेटा वापरासारख्या सूचना मिळतील.

जाणून घ्या स्पेसिफिकेशन

कंपनीकडून या शानदार स्मार्टफोनमध्ये दोन मोठे रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 6.72 इंचाचा IPS LCD पॅनल दिला असून जो फुल HD+ रिझोल्यूशन ऑफर करत आहे. स्टोरेजचा विचार केला तर या फोनमध्ये 6 GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 128 GB UFS 2.2 अंतर्गत स्टोरेज दिले आहे. या स्मार्टफोनचा मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सल्सचा आहे आणि त्यासोबत 2 मेगापिक्सल्सचा डेप्थ सेन्सर दिला आहे. यामध्ये 5000mAh ची बॅटरी उपलब्ध करून आली आहे.

किंमत

कंपनीने या स्मार्टफोनच्या 4 GB + 64 GB वेरिएंटची किंमत 10,999 रुपये तर त्याच्या 6 GB + 128 GB वेरिएंटची किंमत 12,999 रुपये ठेवली आहे. त्यामुळे जर तुम्हालाही एक शानदार स्मार्टफोन घ्यायचा असल्यास कंपनीचा हा उत्तम फोन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल.