“याद करो वो दिन, मुख्यमंत्री ठाकरेंकडून आणीबाणीसारखी वागणून अपेक्षित नाही”

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्या नंतर अटक करण्यात आली होती. सदावर्ते यांची १८ दिवसानानंतर आर्थर रोड कारागृहातून सुटका (arther road jail) करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, 1857 पासून जो संघर्ष देशाच्या इतिहासाचा हिस्सा आहे, तो संघर्ष आम्ही आनंदाने स्वीकारलेला आहे. संघर्षाला स्विकारल्याशिवाय विजयी होता येत नाही. मुश्किलो के आगे जीत होती है. सत्य परेशान हो सकता है पराभूत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘याद करो वो दिन. हेच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणली होती. तेव्हाही पत्रकारांवर सेन्सॉरशीप लादल्याचा प्रयत्न झाला. याही वेळी पत्रकारांची उलटतपासणी.

पण 44वी घटनादुरुस्ती भारताची वाचा आणि आजही तुम्ही आणीबाणीसारखी परिस्थिती ओढावून ठेवली असेल, तर राज्यात केंद्र सरकारनं, राष्ट्रपतींनी कॉल घेण्याची गरज आहे,’ असेही सदावर्ते म्हणाले आहेत.

गुणरत्न सदावर्ते यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली आहे. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री ठाकरेंकडून (CM Thackeray) आणीबाणीसारखी वागणून अपेक्षित नाही. आमच्यासमोर जी वेळ आणली त्याला आम्ही सामोरे गेलो.

कारण, आमच्यासोबत सर्वसामान्य होते. आज आणीबाणी आहे का, असं सरकारला सूचवायचंय का, असा प्रश्न मी उपस्थित करतोय. इंदिराजींच्या केसमध्येही राईट टू एक्स्प्रेशनवर चर्चा झाली होती.

माझ्याही केसमध्ये तेच झालं. इंदिराजींची आणीबाणी आणि आताचा काळ हा सेमच वाटतोय. आम्ही निष्ठेनं कष्टकऱ्यांसाठी काम करतो,’ असे माध्यमांशी बोलताना सदावर्ते यांनी सांगितले आहे.