Jio True 5G : 61 रुपयांच्या 5G प्लॅनमध्ये मिळत आहे भरपूर फायदे, तुम्हीही वाचून व्हाल थक्क

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio True 5G : जिओचे अनेक प्लॅन ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणारे आणि त्यांच्या खिशाला परवडणारे आहेत. अशातच कंपनीने आता सर्वात स्वस्त 5G प्लॅन आणला आहे. ज्याची किंमत 61 रुपये इतकी आहे.

सर्व जिओ प्लॅनचे वापरकर्ते 5G वापरू शकत नाहीत. यापूर्वी 5G नेटवर्क 239 रुपये किंवा त्याहून अधिकच्या प्लॅनसह उपलब्ध होते, परंतु आता कंपनीने त्यात बदल केला आहे. आता कंपनीने नवीन 5G अपग्रेड प्लॅन सादर केला आहे.

आता Jio ने 61 रुपयांचा 5G अपग्रेड प्लॅन आणला आहे. तुमच्याकडे जर 5G फोन असेल तर, तुमच्या परिसरात 5G नेटवर्क आहे पण तुम्ही तुमच्या फोनमध्ये 5G वापरू शकत नसाल तर तुम्ही हे रिचार्ज करू शकता.

Jio च्या या 5G अपग्रेड प्लानमध्ये 6 GB हाय-स्पीड डेटा उपलब्ध असणार आहे. या व्यतिरिक्त, या प्लॅनची ​​कोणतीही वैधता नसेल म्हणजेच त्याची वैधता ही तुमच्या विद्यमान योजनेची वैधता असेल. Jio ची Rs 61 Jio वेलकम ऑफर Rs 119, Rs 149, Rs 179, Rs 199 आणि Rs 209 च्या प्लॅन्ससोबत काम करणार आहे.

हे रु. 119, रु. 149, रु. 179, रु. 199 आणि रु. 209 चे प्लॅन 5G वेलकम ऑफरसोबत येत नाहीत. Jio 5G वेलकम ऑफर अधिक किमतीच्या प्लॅनसह उपलब्ध आहे, म्हणून Jio ने कमी किमतीच्या प्लॅनच्या वापरकर्त्यांसाठी 61 रुपयांची 5G अपग्रेड योजना सादर केली आहे ज्यामुळे आता सर्व वापरकर्ते 5G वापरू शकतील.