Samsung Smartphone : आजपासून खरेदी करता येणार Samsung Galaxy A14 5G आणि A23 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Smartphone : सॅमसंगचे आगामी स्मार्टफोन म्हणजे Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A23 5G आजपासून विकत घेता येणार आहेत. चाहते अनेक दिवसांपासून या स्मार्टफोनची वाट पाहत होते.

आजपासून त्यांना हा फोन खरेदी करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची किंमतही खूप कमी आहे आणि फीचर्सही जबरदस्त दिले आहेत. जाणून घेऊयात या फोनबद्दल सविस्तर..

जाणून घ्या किंमत आणि ऑफर

कंपनीचा आगामी स्मार्टफोन म्हणजे Samsung Galaxy A14 5G तीन स्टोरेज प्रकारांमध्ये येतो, त्याच्या 4 GB RAM + 64 GB स्टोरेजची किंमत 16,499 रुपये, 6 GB RAM + 128 GB स्टोरेजची किंमत 18,999 रुपये आणि 8 GB RAM + 128 GB स्टोरेजची किंमत 20,999 रुपये इतकी आहे.

तर कंपनीचा दुसरा स्मार्टफोन म्हणजे Samsung Galaxy A23 5G या दोन स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध आहे .या फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजची किंमत 22,999 रुपये आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजची किंमत 24,999 रुपये इतकी आहे. ऑफरचा एक भाग म्हणून, ग्राहक आता SBI, IDFC आणि Zestmoney द्वारे केलेल्या खरेदीवर रु. 2,000 पर्यंतचा कॅशबॅक घेऊ शकतात.

Samsung Galaxy A14 5G ची फीचर्स जाणून घ्या

कंपनीचा Samsung Galaxy A14 5G सह प्रीमियम डिझाइन उपलब्ध आहे. तो फोन गडद लाल, हलका हिरवा आणि काळ्या रंगात खरेदी ग्राहकांना करता येईल. तसेच या फोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे. तीन मागील कॅमेरे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आहे. इतर दोन लेन्समध्ये डेप्थ आणि मॅक्रो लेन्सचा समावेश आहे.

त्याशिवाय या फोनमध्ये 16 GB पर्यंत RAMअसणार आहे. फोनमध्ये Exynos 1330 प्रोसेसर दिला आहे, जो ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. Galaxy A14 5G सह 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तो पॉवर सेव्हिंग मोडसह 5000mAh बॅटरी देखील पॅक करतो.

Samsung Galaxy A23 5G ची भन्नाट फीचर्स जाणून घ्या

कंपनीच्या Samsung Galaxy A23 5G या फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये Android 12 सह One UI 4.1 उपलब्ध आहे. तसेच चार मागील कॅमेरे आहेत.

ज्यात प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आहे. इतर तीन लेन्स अल्ट्रा वाइड, डेप्थ आणि मॅक्रो आहेत. सॅमसंग ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) देखील कॅमेरासह समर्थित आहे.

Galaxy A23 5G मध्ये 13-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. तर ग्राहकांसाठी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आणि 16 जीबी रॅम पर्यंत व्हर्च्युअल रॅम उपलब्ध असणार आहे. फोनसह, कंपनीने 3.5 वर्षांच्या सुरक्षा अपडेटचा दावा करण्यात येत आहे. तसेच 5000 mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. Galaxy A23 5G सिल्व्हर, ऑरेंज आणि लाइट ब्लू कलरमध्ये ग्राहकांना खरेदी करता येईल.