Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंना विधानसभा लढवायची होती, तांबेंच्या आरोपानंतर काँग्रेसचा गौप्यस्फोट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Satyajeet Tambe : आज नाशिक पदवीधरचे नवनियुक्त आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले. काँग्रेसवर निशाणा साधत त्यांनी प्रदेश काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पक्षाकडून चुकीचा एबी फॉर्म पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या बदनामीचे षडयंत्र रचले गेले. असेही ते म्हणाले. असे असताना आता त्यांना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उत्तर दिले आहे. सत्यजीत मला सहा महिन्यांपूर्वी बोलले होते, मी माझ्या वडिलांच्या जागेवर का निवडणूक लढूवू? असे म्हटले होते.

मी लढवली तर विधानसभाच लढवेन, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे. तसेच तांबे यांना फॉर्म उशिरा मिळाला, असे त्यांनी आपल्याला कधीच सांगितलेल नाही, यामुळे आता पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

पक्षावर गंभीर आरोप होत असताना लोकांसमोर खरी परिस्थिती यावी, यामुळे काँग्रेस पक्षाची भूमिका मी मांडत आहे. ज्या गोष्टी पक्षाच्या अंतर्गत व्हायला हवे, त्या पक्षाच्या आतच व्हायला हव्यात, असेही अतुल लोंढे म्हणाले.

आमचे नेते राहुल गांधी एकीकडे वैचारिक लढा देत आहेत. मात्र त्याचवेळी दुसरीकडे काँग्रेसवर निष्ठा असलेली व्यक्ती म्हणते की, मला भाजपने मतं द्यावी. हे मान्य तरी होऊ शकेल का असेही त्यांनी म्हणत तांबे यांच्यावर निशाणा साधला आहे.