चिन्ह गोठविलं, ठाकरेंची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News:केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्ष चिन्ह धनुष्यबाण गोठविल्याचा आणि शिवसेना हे नाव दोन्ही गटांनी न वापरण्याचा निर्णय दिला आहे.

या निर्णयाविरोधात शिवसेनेने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. थेट सुप्रिम कोर्टात न जाता दिल्लीतील उच्च न्यायालयात आयोगाच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार निर्णय झाला नसल्याचा आरोप करून शिवसेनेतर्फे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

दरम्यान चिन्ह गोठविल्यानंतर आयोगाकडून आजच नवीन चिन्ह आणि पक्षाचे नाव यासंबंधी निर्णय होणार आहे. त्यापूर्वीच ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी केव्हा होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.