Soybean Rate: सोयाबीनच्या बाजारभावात घसघशीत वाढ, शेतकऱ्यांना दिलासा; जाणुन घ्या बाजारपेठेतलं चित्र

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi News Marathi: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी (Soybean Grower) दरवाढीच्या अनुषंगाने खरीप हंगामातील सोयाबीनची साठवणूक करून ठेवली होती. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी (Farmer) उन्हाळी हंगामात सोयाबीनची लागवड (Soybean Farming) केली होती त्यांनी देखील आपला सोयाबीन दर वाढ होईल म्हणुन मळणी करून साठवला होता.

मात्र गेल्या आठवड्यात सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) मोठी घसरण झाली यामुळे सोयाबीनची साठवणूक (Soybean Store) करून ठेवलेल्या शेतकऱ्यांची काळजाची धडधड देखील वाढली होती. आगामी काही दिवसात खरीप हंगाम (Kharif Season) सुरु होणार असल्याने खरीपाचे नियोजन करणारा शेतकरी यामुळे चिंतातूर झाला होता.

मात्र आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या चार दिवसात सोयाबीनच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. बाजारात सोयाबीनच्या भावात गत आठवड्याच्या तुलनेत 400 रुपयांची वाढ झाली आहे.

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, प्रक्रिया उद्योगाकडून सोयाबीनची मागणी वाढल्याने सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झाली आहे. खरीप हंगामापूर्वी सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, गुरुवारी लातूर एपीएमसीमध्ये सोयाबीनला 6,800 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला. बाजारभावात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी निश्चितच दिलासा देणारी बाब आहे.

मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे मध्यंतरी केंद्र शासनाने सोया पेंड आयातीला परवानगी दिल्यामुळे देशाअंतर्गत सोयाबीनची मागणी कमी झाली होती यामुळे सोयाबीनच्या दरावर देखील विपरीत परिणाम झाला.

जे सोयाबीन सात हजार रुपयाहून अधिक भावात विक्री होत होते ते सोयाबीन चक्क 6 हजारावर येऊन ठेपले यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत होता. याचा सर्वाधिक फटका खरीप हंगामातील सोयाबीनची साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला,

शिवाय उन्हाळी हंगामातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देखील यामुळे मोठे नुकसान होणार होते. मात्र आता खरिपाच्या ऐन तोंडावर सोयाबीनच्या दरात वाढ झाल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा मोकळा श्वास सोडला आहे.

यावर्षी कधी नव्हे ते राज्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात सोयाबीन पेरणीचा अभिनव उपक्रम हाती घेतला होता. विशेष म्हणजे यासाठी कृषी विभागाने देखील कंबर कसली होती. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी हंगामात सोयाबीनची पेरणी केली गेली.

वातावरण देखील उन्हाळी सोयाबीन साठी पोषक असल्याने चांगले उत्पादन देखील शेतकऱ्यांनी मिळवले. मात्र उन्हाळी सोयाबीन काढणी झाली आणि सोयाबीनचे दर लक्षणीय कमी झाले यामुळे उन्हाळी हंगामातील सोयाबीनचा प्रयोग कर शेतकऱ्यांच्या चांगलाच अंगलट येणार होता. मात्र आता सोयाबीनच्या दरात वाढ झाली असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आनंदी असल्याचे दृश्य बघायला मिळत आहे.