State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता ! अखेर ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झाली वाढ ; जीआर आला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : राज्यातील राज्य कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता वाढीसाठी मागणी करत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता लागू झाला असल्याने महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील 38 टक्के दराने महागाई भत्ता लवकरच लागू झाला पाहिजे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणे अपेक्षित आहे. दरम्यान सहाव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदवार्ता समोर आली आहे.

केंद्र सरकारने सहाव्या वेतन आयोग अंतर्गत वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासून नऊ टक्के महागाई भत्ता वाढ दिली आहे. राज्यातील सहावा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्तावाढ देणे अपेक्षित आहे. आता यासंदर्भात विधी व न्याय विभागाचा एक महत्त्वाचा जीआर आला असून राज्यातील दुय्यम न्यायालयातील 1 जानेवारी 2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ लागू करण्यात आली आहे.

हा सदर जीआर 21 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग यांच्या माध्यमातून जाहीर झाला आहे. खरं पाहता, सहावा वेतन आयोग अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जुलैपासून 9 टक्के महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे. याच धर्तीवर आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील 1 जानेवारी 2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना महागाई भत्त्यात 9 टक्के वाढ जुलै 2022 पासून अनुज्ञेय करण्यात आली आहे.

म्हणजे आता या संबंधित कर्मचाऱ्यांना 212% दराने महागाई भत्ता मिळणार आहे. सदर महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासून देण्यात आली असल्याने महागाई भत्ता थकबाकी देखील संबंधित कर्मचाऱ्यांना वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निश्चितच संबंधित राज्य कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक लाभ होणार आहे. तसेच सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढ लवकरच मिळेल अशी आशा देखील बळावली आहे.

21 नोव्हेंबर रोजी विधी व न्याय विभागाने जारी केलेला जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा