Successful Farmer: मानलं भावा! शिक्षणानंतर नोकरीऐवजी शेतीला निवडलं अन भावड्याचं नशीबचं पलटल, आज शेतीतुन लाखोंची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer: भारत शेतीप्रधान देश (Agriculture Country) असला तरी देखील आपल्या देशातील शेतकऱ्यांची (Farmer) आर्थिक परिस्थिती आजही मोठी दयनीय आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर देखील अनेकदा जगाचे पोट भरणाऱ्या बळीराजाला उदरनिर्वाह भागवण्यासाठी सावकाराचे पाय धरावे लागतात.

बदलत्या हवामानामुळे (Climate Change) तसेच शेतीमालाला मिळतं असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दाबला गेला आहे. मात्र असे असले तरी देशात असे देखील शेतकरी बांधव आहेत जे विपरीत परिस्थितीत शेती व्यवसायातून (Farming) चांगले उत्पन्न कमवीत आहेत.

उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील शेती व्यवसायात काळाच्या ओघात आमुलाग्र बदल करत आर्थिक सुबत्ता प्राप्त केली आहे. सतीश कुमार नामक शेतकऱ्याने डेअरी फार्मिंग, मत्स्यपालन आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करून लाखों रुपये कमविण्याची (Farmers Income) किमया साधली आहे.

मित्रांनो सतीश शेतकरी कुटुंबातील असल्याने अगदी लहानपणापासून त्यांचा आणि शेतीचा संबंध आहे. त्यांनी आपल्या वडिलांना शेतीत काम करताना जवळून पाहिले आहे. खरं पाहता त्यांचे वडील पारंपरिक पद्धतीने शेती करायचे मात्र पारंपरिक शेती पद्धतीनत त्यांच्या वडिलांना खुपच कमी उत्पन्न मिळतं असे.

शिवाय त्यांना अधिक मेहनत देखील घ्यावी लागतं असे. त्यावेळी त्यांच्या वडिलांकडे कुठलेचं ट्रॅक्टर नव्हते शिवाय लाईटची व्यवस्था नव्हती तसेच पिकाला सिंचन करण्यासाठी पर्याप्त साधन देखील नव्हते. यामुळे सतीश यांनी आपल्या वडिलांना शेती व्यवसायात मदत करायची असे ठरवले.

सतीश यांनी आपल्या शिक्षणासमवेत आपल्या वडिलांना शेतीत मदत करायला सुरवात केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरींऐवजी शेती करण्याचा साहसी निर्णय घेतला आणि आजच्या घडीला त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी मोठा कारगर सिद्ध होतं आहे.

सुरवातीला सतीश यांनी ऊस लागवड करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने उसाची शेती सुरु केली. ऊसाचे पीक तयार झाल्यावर त्यांनी प्रथम क्रशरमधून उसाचा रस काढला आणि गूळ तयार करून त्याची विक्री केली. सुरुवातीपासूनच सतीश यांच्या मनात शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्याचा विचार होता.

मग काय त्यांनी शोधाशोध केली अन खूप विचार करून दुग्ध व्यवसाय सुरू केला, त्यांच्याकडे 4 ते 6 जनावरे होती आणि यासाठी त्यांनी सरकारी योजनांचा लाभही घेतला. स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनीही त्यांना मदत केली. हळूहळू त्यांचा व्यवसाय भरभराटीला आला आणि जनावरांची संख्या वाढली.

आज त्यांचे डेअरी फार्म गावात सर्वात मोठे आहे. त्यांनी बायोगॅस प्रकल्पही उभारला आहे. येथे जनावरांचे शेण वापरले जाते. तसेच ते सेंद्रिय शेती करतात. त्यांना सेंद्रिय खत खरेदी करण्याची गरज नाही. आज ते सेंद्रिय पद्धतीने मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात आणि त्यातून गूळ विकतात. सेंद्रिय ऊसाचा गुळ सामान्य गुळापेक्षा जास्त दराने विकला जातो, त्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना मदत केली
दुग्धव्यवसाय आणि सेंद्रिय शेतीमध्ये यशस्वी झाल्यानंतर ते मत्स्यव्यवसायात आले आणि येथेही त्यांना यश मिळाले. आज दुग्धव्यवसाय, सेंद्रिय शेती आणि मत्स्यव्यवसायातून सतीश चांगली कमाई करत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांसाठी सतीश एक प्रेरणास्थान बनले आहेत. ते इतर शेतकऱ्यांनाही मदत करतात आणि सेंद्रिय शेतीचे फायदे सांगतात.

ते म्हणतात की, आम्ही सेंद्रिय शेतीतून दर्जेदार आणि आरोग्याला पोषक अशी उत्पादने तर तयार करतोच, पण पर्यावरणाच्या हितासाठीही काम करतो. निश्चितच सतीश आणि शेतीमध्ये मिळवलेले हे यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.