Success: मानलं गुरुजी! एकेकाळी पेशाने शिक्षक होते मात्र, नोकरीं गेली अन सुरु केली मोत्यांची शेती; आता कमवतोय लाखोंचे उत्पन्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer succes story : देशात 2020 मध्ये कोरोना नामक आजाराने मोठं थैमान घातलं होतं. या महामारीच्या काळात अनेक लोकांना आपल्या नोकऱ्या गमावल्या लागल्या अनेकांचे व्यवसाय देखील धोक्यात आलेत.

राजस्थानच्या अजमेरच्या रझा मोहम्मद याला देखील कोरोना काळात आपली नोकरीं गमवावी लागली. 41 वर्षीय रझा मोहम्मद याची नोकरीं गेल्यानंतर त्याच्यापुढे आपल्या पापी पोटाची खळगी कशी भरायची असा सवाल उपस्थित झाला.

खरं पाहता कोविडपूर्वी रझा मोहम्मद शाळेत शिक्षक होते आणि आपल्या नोकरीत ते आनंदी होते. पण लॉकडाऊनमुळे त्याच्या शाळेला कुलूप लागले आणि तो रस्त्यावर आला. तथापि, या कठीण काळात,

त्याने आपल्या जीवनात उंच भरारी घेण्याचे स्वप्न बघायची आशा काही सोडली नाही आणि नवीन पर्याय शोधण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याला त्याच्या एका ओळखीच्या माणसाने मोत्यांच्या शेतीबद्दल (Pearl Farming) अवगत केले.

पर्ल फार्मिंग बद्दल थोडी माहिती मिळाल्यानंतर रझा मोहम्मदला खात्री पटली की तो हे काम सहज करू शकतो. मग काय आपला शिक्षकी दिमाग लावला अन पुढे पर्ल फार्मिंगचे प्रशिक्षण घेतले आणि स्वतःच्या घरी मोती शेती (Farming) सुरु केली.

रझा यांच्या या महत्वाच्या निर्णयामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. सध्या तो पर्ल फार्मिंगच्या माध्यमातून 2 लाख रुपयांपर्यंत कमावत असून इतरांसाठी गुरुजी प्रेरणास्थान बनले आहेत.

अजमेरच्या मौजे रसुलपुरा येथे राहणारा रझा सांगतो की, त्याने दीड वर्षांपूर्वीच मोत्यांची शेती सुरू केली आहे. पूर्वी ते शाळेत शिक्षक होते आणि मुलांना शिकवायचे.

कोविडमध्ये नोकरी गमावल्यानंतर आता त्यांनी शेती कसण्यास सुरवात केली आहे. सुरुवातीला गुरुजीना मोती कसा तयार केला जातो किंवा मोती शेती कशी करायची हे माहीत नव्हते. यावेळी त्यांना माहिती मिळाली की, राजस्थानमधील नरेंद्र कुमार गरवा हे प्रदीर्घ काळापासून मोत्यांची शेती करत असून इतरांनाही कौशल्य शिकवतात.

मग काय, त्यांनी नरेंद्र यांच्याशी संपर्क साधला आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वत:च्या शेतात 70 हजार रुपयांत शिंपल्यापासून मोती बनवण्याचे युनिट सुरू केले.

त्यासाठी त्यांनी आपल्या शेतात 10/25 च्या जागेत एक लहान शेततळे तयार केले आणि त्यामध्ये देशाच्या विविध भागातून खरेदी केलेले शिंपले ठेवले. चांगल्या शेतीसाठी, तो सुमारे 1000 ऑयस्टर एकत्र ठेवतो आणि त्यांची पूर्ण काळजी घेतो.

रझा यांच्या मते, मोतीच्या शेतीतुन चांगली बक्कळ कमाई करण्यासाठी ते प्रत्येक ऑयस्टरमध्ये न्यूक्लियस सोडतात आणि नियमितपणे पाण्याचा पीएच आणि अमोनिया पातळी तपासतात. काही महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर सर्व काही ठीक झाले तर एका शिंपल्यातून किमान दोन चांगले मोती मिळू शकतात.

नुकसान होत नाही असे नाही. 20-25 टक्के ऑयस्टर खराब होतात. मात्र, तंत्रज्ञानाच्या मदतीने चांगल्या प्रतीचे मोती मिळवून नुकसान भरून काढणे शक्य होतं असल्याचे रझा गुरुजी स्पष्ट करतात.

बाजारात मोत्यांची किंमत गुणवत्तेनुसार 200 ते 1,000 रुपयांपर्यंत असते असे रझा माहिती देतांना सांगतात. रझा यांच्या मते, ते एका छोट्याशा जागेत मोती शेती करत आहेत तरी देखील ते 3 लाखापर्यंत कमाइ करत आहेत.

हेचं जर जर मोठ्या प्रमाणावर केले तर कमाई वाढू शकते. पारंपारिक शेतीऐवजी तंत्रज्ञानाचा वापर करून मोत्यांची शेती घेण्याच्या निर्णयाचा रझा यांना अभिमान आहे शिवाय यामुळे त्यांना चांगली कमाई देखील होतं आहे.

रझा यांना पर्ल फार्मिंगमुळे पंचक्रोशीत एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. निश्चितच पर्ल फार्मिंग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते मात्र यासाठी शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.