“ठाकरेंनी आता कुठे तरी थांबायला पाहिजे” सुरेखा पुणेकरांची राज ठाकरेंवर टीका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबाद मध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत सभा झाली. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राज ठाकरे यांच्या शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर आता राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक सरचिटणीस सुरेख पुणेकर (Surekha Punekar) यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरे हे चौरंगी चिरा आहे. त्यांनी व्यवस्थित राजकारण केले पाहिजे. ठाकरेंनी आता कुठे तरी थांबायला पाहिजे. कोणाचीतरी टीका करून जातीपातीचे राजकारण करण्याचे प्रकार ते करत आहेत, ते थांबविले पाहिजे असे सुरेखा पुणेकर म्हणाल्या आहेत.

सुरेखा पुणेकर म्हणाल्या, आपल्या देशात सर्वप्रथम महिला धोरण आणले ते महाराष्ट्र राज्याने. त्यात शरद पवारांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे महिला विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत.

मोठमोठ्या पदांवर आहेत. शरद पवारांनी विविध जातीच्या लोकांना सोबत घेऊन काम केले. पक्षातही विविध पदांवर विविध जातीचे लोक आहेत. जात मानणारे असते, तर असे कधी पहायला मिळाले असते का, असा सवालही त्यांनी केला.

उलट राज ठाकरेच जातीपातीचे राजकारण करतात, असा पलटवार त्यांनी केला. शरद पवार तळागाळातील लोकांबरोबर काम करणारे, ओळखणारे नेते आहेत, असेही सुरेखा पुणेकर म्हणाल्या आहेत.

पुढे बोलताना सुरेखा पुणेकर म्हणाल्या, राज ठाकरे भोंग्यांचा विषय काढतात. हनुमान चालिसा, मशीद असे मुद्दे पुढे करतात. तुम्ही मदतारांना असे दुखावणार असाल तर कोण तुमच्यासोबत येणार, असा सवाल सुरेखा पुणेकर यांनी केला आहे.