दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत बाप लेकावर प्राणघातक हल्ला केला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत दोघा जणांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना शनिवारी पहाटे घडली.

या प्राणघातक हल्ल्यात दिलीप रामराव झंज (वय 65) व प्रकाश दिलीप झंज (वय 31) दोघे पितापुत्र जबर जखमी झाले. या दरोड्यात सोनेचांदीच्या मौल्यवान दागिन्यासह मोठा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हातगाव येथील झंज कुटुंब गावात राहते. दरोडेखोरांनी शनिवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

सामानाची उचकापाचक करत रोख रक्कम व सोने चांदीच्या दागिने लंपास केले जात असताना दिलीप झंज, प्रकाश झंज यांनी दरोडेखोरांशी प्रतिकार केला.

दरोडेखोरांनी पितापुत्रावर सशस्त्र हल्ला केल्याने दोघे रक्तबंबाळ झाले डोक्यात धारदार हत्याराने वार केले. आरडाओरडा केल्याने दरोडेखोर पसार झाले.

ग्रामस्थांनी जखमींना पुढील उपचारासाठी शेवगावला हलविण्यात आले. मात्र डोक्याला जबर मार असल्याने गंभीतर परिस्थिती झाल्याने अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

ग्रामस्थांनी घटनेची माहिती बोधेगाव पोलिसांना दिली मात्र कोणीच घटना आले नाही. त्यानंतर सकाळी पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली.