निसर्गाचे दुष्टचक्र पुन्हा बदलले ! सोलापूर मध्ये मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Maharashtra news :- सध्या राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यातच दुसरीकडे पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीच्या पिकांना धोका निर्माण आसून शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

सोलापूर शहरालगतच्या कुंभारी गावावमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे.तर वाढत्या तापमानामध्ये अचानक पाऊस झाल्यानं वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे.

यामुळे सोलापूर शहरातील नागरीक सुखावले आहे. मात्र अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवली आहे.

शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास ऐनवेळी हिरावण्याची भीती अवकाळी पावसाच्या येण्यानं निर्माण झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष पिकं, काढणीला आलेला कांदा, काढलेली ज्वारी या पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते.

त्यामुळे अवकाळीच्या हजेरीनं शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद जिल्ह्यात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. लोहारा तालुक्यात काही भागातही अवकाळी पाऊस झाला आहे.