Whatsapp Features : वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपणार! ‘या’ दिवशी येणार अप्रतिम फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Whatsapp Features : व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आणखी शानदार फीचर्स पाहायला मिळणार आहेत. अनेक दिवसांपासून वापरकर्ते या फीचर्सची आतुरतेने वाट पाहत होते.

परंतु, आता हे फीचर्स वापर्त्यांसाठी येणार आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग आणखी मजेशीर होणार आहे. अनेक फीचर्सची बीटा आवृत्तीमध्ये चाचणी सुरू असून पुढील काही आठवड्यात सर्व वापरकर्त्यांना ही फीचर्स मिळणार आहेत.

अनेक दिवसांपासून वापरकर्ते या फीचर्सची मागणी करत होते आणि आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. वापरकर्त्यांना लवकरच व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मूळ गुणवत्तेत फोटो पाठवण्याचा पर्यायही उपलब्ध होणार आहे. तसेच आता मीडिया शेअरिंग मर्यादा वाढवली असून आता एकाच वेळी 30 पेक्षा जास्त मीडिया फाइल्स शेअर करता येईल.

मूळ गुणवत्तेत फोटो पाठवण्याचा पर्याय मिळणार

वापरकर्त्यांचे व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो शेअर करत असताना ते कॉम्प्रेस केले जातात, ज्यामुळे फोटोंच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता. आता लवकरच मूळ गुणवत्तेत उच्च-रिझोल्यूशन फोटो पाठवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनेक दिवसांपासून वापरकर्ते या फीचरची वाट पाहत होते.

वाढणार मीडिया शेअरिंग मर्यादा

कंपनीने आता व्हॉट्सअ‍ॅप बीटा टेस्टर्ससाठी मीडिया शेअरिंग मर्यादा बदलली असून पूर्वी वापरकर्ते एकाच वेळी फक्त 30 फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू शकत होते. परंतु आता ही मर्यादा 100 पर्यंत वाढवली आहे. हे नवीन फीचर अँड्रॉइड 2.23.4.3 बीटा अपडेटमध्ये दिसून आले असून लवकरच ते सगळ्यांसाठी रिलीज केले जाणार आहे. त्यामुळे आता एकाच वेळी अनेक फाइल्स शेअर करता येणार आहे.

चॅट्स हिस्ट्री ट्रान्सफर करता येणार

वापरकर्त्यांना आता एका डिव्हाईसवरून व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स ट्रान्सफर करण्यासाठी गुगल ड्राइव्हची मदत घ्यावी लागणार नाही. वापरकर्ते फक्त QR कोड स्कॅन करून हे करू शकतील. ही प्रक्रिया लांबलचक असून वापरकर्त्यांना त्यांच्या चॅटचा आधी क्लाउड स्टोरेजमध्ये बॅकअप घ्यावा लागतो. यानंतर गुगल ड्राइव्हवरील चॅट्स नवीन फोनमध्ये रिस्टोअर करावे लागणार आहेत.