अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गुन्हेगाराची टोळी दीड वर्षांकरीता हद्दपार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022  Ahmednagar Crime :- खुन, दरोडा, खुनाचा प्रयत्न करून नेवासा व परिसरात दहशत निर्माण करणार्‍या रवी राजु भालेराव टोळीला अहमदनगर जिल्ह्यातून दीड वर्षांकरीता (18 महिने) हद्दपार करण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हद्दपारीचे आदेश काढले आहेत. टोळीप्रमुख रवी राजु भालेराव (वय 32), टोळीसदस्य शंकर ऊर्फ दत्तू अशोक काळे (वय 32), निखील किशनलाल चंदानी (वय 27), रवी ऊर्फ रवींद्र शिवाजी शेरे (वय 28), शिवा अशोक साठे (वय 29 सर्व रा. नेवासा फाटा ता. नेवासा),

सतिष लक्ष्मण चक्रनाराण (वय 26), नितीन ऊर्फ मुन्ना असिफ महम्मद शेख (वय 32, दोघे रा. नेवासा खुर्द ता. नेवासा) अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.

नेवासा व परिसरात रवी भालेराव टोळीने शरिराविरूध्द गंभीर गुन्हे करून दशहत निर्माण केली होती. अग्नी शस्त्र जवळ बाळगूून खुन करणे, दरोडा टाकणे,

गैरकायद्याची मंडळी जमवून दुखापत करणे, अनाधिकाराणे घरात प्रवेश करणे, लाकडी दांडक्याने मारहाण करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्र बाळगणे, जिवे मारण्याची धमकी देणे,

सरकारी आदेशाचा अवमान करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे भालेराव टोळीविरूध्द दाखल होते. गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल असलेल्या भालेराव टोळीला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 नुसार अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता हद्दपार करण्यात यावे,

असा प्रस्ताव नेवासा पोलिसांनी 11 ऑक्टोबर 2021 रोजी पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठविला होता. भालेराव टोळीविरूध्द नेवासा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल असल्याने

नमुद गुन्ह्याची व टोळी प्रमुख व टोळीसदस्यांनी सविस्तर सर्वकश चौकशी करून टोळीपासून नेवासा पोलीस ठाणे हद्दीत व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी व टोळीची सर्वसामान्य नागरिकांमध्ये

असलेली दहशत कमी करण्यासाठी भालेराव टोळीतील सात जणांना दीड वर्षांकरीता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.