प्रशासनाच्या नियोजनाअभावी शहरात लसीकरणाचा उडतोय फज्जा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याला अटकाव करण्यासाठी प्रशासनाने लसीकरण मोहीम सुरु केली आहे. प्रथमतः फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली.

त्यानंतर 45 वय वर्ष पूर्ण असलेल्या नागरिकांना लस देण्यात आली. आता 1 मे पासून वय वर्ष 18 पूर्ण असलेल्या प्रत्यक्ष व्यक्तीचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट उराशी बाळगत असतानाच मात्र नगर शहरात लसीराकांचा अक्षरशः फज्जा उडाला आहे.

केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांनाच कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा केली. राज्य सरकारने ही लस मोफत देण्याचे मान्य केले. त्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करण्याचे सांगण्यात आले.

मात्र या पोर्टलवर नोंदणी होत नसल्याने अनेकांचा हिरमोड होत आहे. पोर्टलवर रजिस्ट्रेशनसाठी मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी मागितला जातो. तो टाकल्यानंतर पुढे ओळखपत्राचा नमुना, वय आदी माहिती भरली जाते.

मात्र यापुढे लसीकरण कोठे आणि केव्हा करायचे अशी माहिती भरण्यात अडचणी येत आहेत. दिलेले केंद्र पंचेचाळीस वर्षांपुढील नागरिकांना असून ते सर्व बुक असल्याचे दर्शवले जाते. अठरा वर्षांपुढील लसीकरणासाठी नगर शहरातील केवळ दोन-तीन केंद्र आहेत.

मात्र तेही बुक असल्याने तेथे नोंदणी होत नाही. अशा अडचणी येत असल्याने काही नागरिक थेट केंद्रावर जात आहेत. एकूणच आवश्‍यकतेप्रमाणे लसीचा पुरवठा होत नसल्याने गोंधळ उडतो आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|