Vivo X90 Pro : स्वस्तात खरेदी करा महागडा फोन! X90 Pro वर मिळत आहे जबरदस्त कॅशबॅक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vivo X90 Pro : विवोचा Vivo X90 Pro हा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला होता. किमतीचा विचार केला तर लॉन्चच्या वेळी त्याची किंमत 84,999 रुपये इतकी होती.

जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. Vivo प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. हा फोन तुम्ही आता शानदार सवलतीसह खरेदी करू शकता. इतकेच नाही तर ग्राहकांना 10,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅकही मिळेल. जाणून घ्या ऑफर.

स्वस्तात करा खरेदी

कंपनीने असे म्हटले आहे की, “आम्हाला तुम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की फोन तुम्ही विनाशुल्क EMI घेऊ शकता. तसेच प्रत्येक खरेदीवर Vivo V-Shield Protection Plan वर 40% पर्यंत सवलत आणि Cashify वर 8000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस मिळेल.”

नवीन किंमतीसह आजपासून 20 ऑक्टोबर 2023 पासून विवोचा हा स्मार्टफोन Flipkart, Vivo India e-store आणि सर्व भागीदार रिटेल स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. फ्लिपकार्टच्या मतानुसार, लॉन्च झाल्यापासूनची ही सर्वात कमी किंमत असून हा स्मार्टफोन लेजेंडरी ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल, ज्याच्या बॅक पॅनलवर व्हेगन लेदर फिनिश आहे.

एक्सचेंज ऑफर

स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा फोन एकाच प्रकारात येतो, ज्यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजमध्ये येतो. हा फोन Flipkart वर 91,999 रुपयांच्या मूळ किमतीसह लिस्ट झाला आहे. फ्लिपकार्ट फोनवर 45,150 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल.

जाणून घ्या खासियत

Vivo X90 Pro त्याच्या प्रीमियम डिझाइन, शक्तिशाली कॅमेरा आणि उत्तम कामगिरीसाठी प्रसिद्ध फोन ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेंशन 9200 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित Funtouch OS वर चालतो.

कंपनीच्या या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये f/1.75 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, f/1.6 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा दिला आहे. f/2.0 अपर्चरसह 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा असून हा फोन सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

या फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4870 mAh बॅटरी कंपनीने दिली आहे. कंपनीचा हा फोन केवळ 8 मिनिटात 0 ते 50 टक्के चार्ज होईल, असा कंपनीने दावा केला आहे. प्रो मॉडेलमध्ये 50W वायरलेस फ्लॅश चार्जसाठी समर्थन आहे.