महाराष्ट्राची दिल्ली बनवायची आहे का? नवनीत राणावर कारवाई होते तर, मग राज ठाकरेंनाही तुरुंगात टाका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारणात तणाव निर्माण केला आहे. काल राज ठाकरे यांची औरंगाबाद या ठिकाणी सभा झाली असून त्या वेळी त्यांनी अनेक मुद्य्यांना हात घातला आहे.

तसेच मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर ४ तारखेला मशिदीसमोर हनुमान चालिसाचं पठण करा, असा निर्धार मनसे पक्षाने घेतला आहे. यावर आता एमआयएमचे (MIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनीही राज ठाकरे यांच्या भाषणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी राज ठाकरे यांचं भाषण हिंसा भडकवणारं आहे. त्याची पोलीस गंभीर दखल का घेत नाही. महाराष्ट्र (Maharashatra) मोठा आहे की व्यक्ती मोठा आहे?, असा सवाल करत नवनीत राणावर (Navneet Rana) कारवाई होऊ शकते तर राज ठाकरेंवर कारवाई का होऊ शकत नाही? त्यांना तुरुंगात टाका. त्यांचं डोकं शांत होईल, असा हल्लाबोल ओवैसी यांनी केला आहे.

त्याचबरोबर एक व्यक्ती औरंगाबादची एकतेला बाधा आणणार आहे का? त्यांचे भाषण म्हणजे हिंसेला प्रवृत्त करणारं आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपल्या भावाविरोधात कारवाई करायची नाहीये. महाराष्ट्राची दिल्ली बनवायची आहे का? राष्ट्रवादी काय करत आहे? असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, तुमचा भाऊ मुख्यमंत्री आहे म्हणून तुम्ही असं बोलत आहात. सर्व भाऊ एक सारखेच आहेत. राज ठाकरे महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत का? हा आमचा सवाल आहे, महाराष्ट्र सरकार आंधळी सरकार आहे. या सरकारमुळे संपूर्ण मुस्लिम समुदाय त्रस्त आहे, असेही असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत.